Type Here to Get Search Results !

नेवासा - शेतकरी मॉलचे संत महंतांच्या हस्ते उदघाटन. | C24TAAS |

 उस्थळ दुमाला येथे शेतकरी मॉलचे संत महंतांच्या हस्ते उदघाटन ; अन्नधान्य पिकविण्यात शेतकरी अग्रेसर असल्यामुळे कोरोनाच्या संकटकाळात देश तरला-हभप उद्धव महाराज.

नेवासा तालुक्यातील उस्थळ दुमाला येथे कृषी तज्ञ कालीदास शेळके यांनी शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या शेतकरी मॉलचे संत महंतांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.नवनवीन तंत्रज्ञान पुढे येत असतांना आधुनिक शेतीकडे शेतकरी वळतांना दिसत आहे.अन्नधान्य पिकविण्यात देशातील शेतकरी अग्रेसर असल्यामुळेच कोरोनाच्या संकटकाळात अन्नदानाचा तुटवडा जाणवला नाही देशही तरला,शेतकऱ्यांना राजासारखी वागणूक मिळण्यासाठी दृष्टीकोन बदलण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यांनी यावेळी बोलतांना केले.

यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी येथील वयोवृद्ध शेतकरी आसाराम काळे हे होते. श्रीराम साधना आश्रमाचे प्रमुख महंत सुनीलगिरी महाराज,महंत गोपालानंदगिरी महाराज,ह.भ.प. विष्णू महाराज सांगळे,ह.भ.प मंगेश महाराज वाघ,पंचायत समितीचे उप सभापती किशोर जोजार,आदर्शगाव सुरेशनगरचे सरपंच पांडुरंग अभंग, हंडीनिमगावचे सरपंच आण्णासाहेब जावळे, उस्थळ दुमालाचे सरपंच बाबासाहेब कोतकर,मुकींदपुरचे सरपंच


नेवासा तालुक्यातील बातम्यासाठी C24 तास WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/I36ibzSWvTDCnuzDjaFcGr
______________________________

Telegram वर ग्रुप जॉईन करा...👇

https://t.me/joinchat/S3zVPTU7uWIqFhgG

दादासाहेब निपुंगे,सोसायटीचे अध्यक्ष सुभाष गायकवाड शेतकरी नेते पी.आर.जाधव,होमगार्ड समादेशक पत्रकार बाळासाहेब देवखिळे,रमेश सावंत यावेळी उपस्थित होते.प्रारंभी नंदकुमार शेळके,कालीदास शेळके,राजेंद्र शेळके,बाळासाहेब शेळके यांनी उपस्थित शेतकऱ्यांचे स्वागत केले.शेतकरी नेते पी.आर.जाधव यांनी प्रास्ताविक केले.नगर औरंगाबाद हायवेवर भविष्य काळात मोठा मॉल शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू केला जाईल कांदा बियाणे निर्मिती येथेच होणार असल्याने दर्जेदार बियाणे देखील रास्त दरात शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येईल असा मानस यावेळी बोलताना व्यक्त केला.


यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोलतांना महंत सुनीलगिरी महाराज यांनी व्यवसाय करतांना उत्तम व्यवहाराने धन कमवावे नीतिमत्ता राखून व्यवहार केल्यास लक्ष्मी तेथे वास करेल असे सांगून शेतकरी मॉलला शुभेच्छा दिल्या.हभप उध्दव महाराज यांनी व्यवसायात सदगुण उद्यमशिलता साहस धैर्य बळ बुध्दी पराक्रम हे गुण अंगीकारल्यास यश दूर नाही असे सांगून इतरांसाठी चांगले करण्याचा प्रयत्न करा,रात्रीची स्वप्ने पहाण्यापेक्षा दिवसाचे स्वप्ने पाहून ती सत्यात उतरविण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन केले. पत्रकार सुधीर चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले तर उद्योजक कालिदास शेळके यांनी उपस्थित शेतकऱ्यांचे आभार मानले.यावेळी उपसरपंच राजेंद्र भदगले, सोसायटीचे उपाध्यक्ष केशव गायकवाड,राजेंद्र गायकवाड, दादासाहेब गायकवाड,दादा पाटील वाघ,कोलते सर, अनिल जाधव,सुनील जाधव,एकनाथ टेकणे, सुरेश काळे, सुनील कोतकर,मोहन धानापूणे, गोरक्षनाथ गायकवाड, सुभाष भदगले,प्रसाद सानप, मुरलीधर सानप,संभाजी सानप,सुरेश सुकाळकर,कानिफनाथ जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇