
शंकर नाबदे, नेवासा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचाराने प्रभावित होऊन नेवासा येथे असंख्य युवकांचा मनसेत प्रवेश नेवासा येथील डाक बंगला प्रांगणात झालेल्या पक्ष प्रवेश सोहळा कार्यक्रम प्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर,मनसेचे शेवगाव तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे,जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ भागवत,विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रविण शिरसाठ, नेवासा ता.अध्यक्ष दिगंबर पवार,वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष दादा देशमुख,विद्यार्थी सेनेचे ता. सचिव अविनाश गाढवे,मनसे ता. सचिव रविंद्र पिंपळे,
![]() |
नूतन शहराध्यक्ष निलेश शेंडगे, ता. उपाध्यक्ष संतोष पतंगे,योगेश काळे, वि.अध्यक्ष गोरख निकम, शहर उपाध्यक्ष नवनाथ जाधव यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार घालून करण्यात आले.मनसेचे ता.अध्यक्ष दिगंबर पवार यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन आज नेवासा तालुक्यातील सर्व युवक मनसेकडे आकर्षित होत असल्याने मनसेच्या गावोगावी शाखा काढून मनसेची मोठी ताकद उभी करू असा निर्धार तालुका अध्यक्ष सचिव रविंद्र पिंपळे यांनी केले.

https://chat.whatsapp.com/I36ibzSWvTDCnuzDjaFcGr
______________________________
Telegram वर ग्रुप जॉईन करा...👇


