Type Here to Get Search Results !

नेवासा - घोडेगाव येथे गावठी कट्ट्यातुन गोळीबार करून दोन वर्षांपासून फरार आरोपी अटक.

नेवासा - घोडेगाव येथे गावठी कट्ट्यातुन गोळीबार करून दोन वर्षांपासून फरार आरोपी अटक.

शंकर नाबदे, नेवासा :  गावठी कट्ट्यातुन गोळीबार करून दोन वर्षांपासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगारास सोनई पोलिसांनी इमामपूर परिसरातून अटक केली. याबाबत अधिक माहिती अशी की 14/8/ 2019 रोजी सायंकाळी 6 वाजता औरंगाबाद-नगर राज्य महामार्गावरील गुडलक हॉटेल घोडेगाव येथे पूर्ववैमनस्यातून झालेल्या वादातून कृष्णा यलप्पा फुलमाळी (वय 28) रा. घोडेगाव याने गावठी कट्ट्यातुन गोळीबार करून सचिन गोरख कुर्‍हाडे या तरुणाला गंभीर जखमी करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार होता. सोनईचे सहाय्यक निरीक्षक रामचंद्र कर्पे यांना गुप्त माहिती मिळाल्यावरून पोलीस स्टाफसह शुक्रवार 30 जुलै रोजी रात्री दहा वाजता साध्या वेषात इमामपूर येथील गिरणीचा महादेव या मंदिर परिसरात छापा टाकून आरोपी फुलमाळी यास अटक केली. आरोपीविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात 4 व शिंगणापूर पोलीस ठाण्यात 1 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. आरोपी फुलमाळी हा बेकायदा शस्त्रे बाळगून गंभीर गुन्हे करणाऱा सराईत गुन्हेगार आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय चव्हाण, हवालदार दत्ता गावडे, पोलीस नाईक बाबा वाघमोडे, पोलीस नाईक माने, पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल थोरात यांनी केली.


नेवासा तालुक्यातील बातम्यासाठी C24 तास WhatsApp group:
https://chat.whatsapp.com/I36ibzSWvTDCnuzDjaFcGr
______________________________

Telegram वर ग्रुप जॉईन करा...👇

https://t.me/joinchat/S3zVPTU7uWIqFhgG



❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇