Type Here to Get Search Results !

नेवासा शहर व नेवासा फाटा बुधवारी बंद...प्रशासनाचा निर्णय. | C24TAAS |

 

नेवासा शहर व नेवासा फाटा बुधवारी बंद...प्रशासनाचा निर्णय. | C24TAAS |

शंकर नाबदे, नेवासा : कामीका एकादशीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी नेवासा शहर व नेवासा फाटा पूर्णपणे बंद ठेवण्याचा आदेश प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी काढला आहे.सर्वसामान्य नागरिकांनी आणि वारक-यांनी या कालावधीत नेवासा शहरात येऊ नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

      कामीका एकादशीच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी संत ज्ञानेश्वर मंदिरात पैस खांबाच्या दर्शनासाठी होणारी मोठी गर्दी होत असते.मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर यंदाचा यात्रा उत्सव रद्द करण्यात आला आहे.दि.४ ऑगस्ट रोजी कामीका एकादशी निमित्त होणारी गर्दी लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून प्रशासनाच्या वतीने मंगळवार दि.३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ ते गुरुवार दि.५ ऑगस्ट सकाळ ८ पर्यन्त नेवासा शहर व नेवासा फाटा येथील दुकाने तसेच वाहतूक बंद ठेवण्याबाबतचा आदेश काढण्यात आला असून संत ज्ञानेश्वर मंदिराकडे जाणारे सर्व रस्ते ही बंद असणार आहे.

आषाढी वद्य(कामीका)एकादशीला बुधवारी दि.४ ऑगस्ट रोजी होणारी संत ज्ञानेश्वर माऊलींची यात्रा मंदिर संस्थानने या अगोदरच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

     श्री क्षेत्र नेवासा हे ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान व माऊलींची कर्मभूमी असल्याने नेवासा नगरीत पंढरीच्या विठुरायाच्या आषाढी शुद्ध एकादशीनंतर येणाऱ्या आषाढी वद्य(कामीका)एकादशीला मोठी यात्रा भरत असते.या दिवशी लाखोंच्या संख्येने माऊलींच्या "पैस" खांबाच्या दर्शनासाठी येथे भाविक येत असतात. तालुक्यातील प्रत्येक गावातून छोट्या-मोठ्या दीडशेहुन अधिक दिंड्या येत असतात मात्र यावेळी या सर्व दिंड्याना परवानगी नाकरण्यात आली असून कोणीही दर्शनासाठी येण्याचा प्रयत्न करु नये असे आवाहन तहसीलदार रूपेश सुराणा यांनी केले.


नेवासा तालुक्यातील बातम्यासाठी C24 तास WhatsApp group:
https://chat.whatsapp.com/I36ibzSWvTDCnuzDjaFcGr
______________________________

Telegram वर ग्रुप जॉईन करा...👇

https://t.me/joinchat/S3zVPTU7uWIqFhgG



❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇