Type Here to Get Search Results !

नेवासा - कोरोना'त आई किंवा वडील गमवलेल्या १२५ विद्यार्थ्यांना अर्ध्या सवलतीत कोर्स सुनिताताई गडाखांची घोषणा. | C24TAAS |

'कोरोना'त आई किंवा वडील गमवलेल्या १२५ विद्यार्थ्यांना अर्ध्या सवलतीत कोर्स; सुनिताताई गडाखांची घोषणा मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम.

शंकर नाबदे, नेवासा : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त विधायक उपक्रम म्हणून  कोरोना महामारीत नेवासा तालुक्यात आई किंवा वडील गमवलेल्या १२५ विद्यार्थ्यांना एमएससीआयटी कोर्सच्या फी मध्ये पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय माजी पंचायत समितीच्या सभापती सुनिताताई गडाख यांनी जाहीर केला आहे. 


आज मुळा कारखाना येथील विश्रामगृह येथे झालेल्या कार्यक्रमात वरील निर्णय जाहीर करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर होते.संचालक कारभारी डफाळ, 
किसन शिकारे, माधव लांडे,पत्रकार विनायक दरंदले, अविनाश येळवंडे, राजेंद्र पवार,बलभीम काळे,महेश बानकर उपस्थित होते.गडाख यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना आवश्यक पुस्तकांचे वाटप करण्यात आले. 

नेवासा तालुक्यातील बातम्यासाठी C24 तास WhatsApp group:
https://chat.whatsapp.com/I36ibzSWvTDCnuzDjaFcGr
______________________________

Telegram वर ग्रुप जॉईन करा...👇

https://t.me/joinchat/S3zVPTU7uWIqFhgG

 एमएससीआयटी कोर्सचे जिल्हा समन्वयक गणेश आठरे व सुभाष गवळी यांच्याशी गडाख यांनी चर्चा केल्यानंतर आज प्रातिनिधिक स्वरूपात तेजस गवळी, प्रियंका साबळे,तनुजा गवळी, तेजस साबळे,तन्मय शिंदे, ईश्वरी औटी,तेजस शिंदे,यज्ञेश लांडे व ओंकार पटारे यांना कोर्स विषयी पुस्तके देण्यात आली.जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या सुचनेनंतर हा उपक्रम राबवून मुख्यमंत्री ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.


कार्यक्रमात 'मुळा'चे अध्यक्ष तुवर यांचे शुभेच्छापर भाषण झाले. कोरोना संकटाचा विळखा अनेक कुटुंबास बसला मात्र यातून सावरत पहिले पाऊल म्हणून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.पुढेही आशा कुटुंबासाठी कार्य करायचे आहे.असे गडाख यांनी भाषणात सांगितले.ग्रामस्थांनी या विशेष उपक्रमाचे स्वागत केले आहे.


❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇