विवाह व वाढदिवसात वृक्ष रोपांचे वाटप ; सोनईतील स्नेह फाऊंडेशनचा उपक्रम.
शंकर नाबदे, नेवासा : सोनई येथील स्नेह फाऊंडेशनच्या वतीने गाव व परीसरात संपन्न होत असलेल्या विवाह समारंभ व वाढदिवस असलेल्या व्यक्तीस वृक्ष रोपांची भेट देवून शुभेच्छा दिल्या जात आहे.हाती घेतलेल्या पर्यावरण उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.
![]() |
मुळा एज्युकेशन संस्थेच्या शनिश्वर विद्यालयात सन १९८८-८९ मध्ये दहावीत असलेल्या पन्नास युवकांनी माजी विद्यार्थी संघ स्थापन करत सेवाकार्याची सुरुवात केली. विद्यालयात जेष्ठ नेते व साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या उपस्थितीत पहीला उपक्रम म्हणून माजी विद्यार्थी स्नेह मेळावा घेतला.सर्वांनी जुन्या आठवणींना उजाळा देत आपली ओळख करून दिली.यामध्ये विवाह होवून सासरी नांदत असलेल्या मुलींने सक्रीय सहभाग घेतला होता.
https://chat.whatsapp.com/I36ibzSWvTDCnuzDjaFcGr
______________________________
Telegram वर ग्रुप जॉईन करा...👇
सर्व सदस्यांनी पुढे माजी विद्यार्थी संघ मधूनच स्नेह फाऊंडेशनची स्थापना करत संगीता जोरवर-पिसाळ यांची अध्यक्षपदी निवड केली.यामधील अनेक सदस्य बाहेरगावी नोकरीस आहेत.शेतकरी, गृहीणी, व्यावसायिक व काही उद्योजकही आहेत.या मित्रांनी योग शिबीर,कोरोना योद्धा पुरस्कार, पूरग्रस्तांना मदत, कोरोनातील गरजूंना किराणा साहित्य व भोजन दिले आहे.भविष्यात मोठे कार्य करणार असल्याचे सदस्यांनी सांगितले.
माजी विद्यार्थी संघाने स्नेह फाऊंडेशनची स्थापना करत कोरोना संसर्गाच्या स्थितीत मोठे काम करत गरजूंना मदतीचा हातभार लावला.सध्या परीसरात होत असलेल्या विवाह समारंभात जाऊन वधूवरांना वृक्ष रोपांचे वाटप व त्यांच्याच हातून वृक्षारोपण केले जात आहे.वाढदिवस असलेल्या व्यक्तीस वृक्ष रोप देवून शुभेच्छा दिल्या जात आहे.संतोष क्षीरसागर,नितीन दरंदले, मनिषा जवादे,डाॅ.संजय तुवर,राजेंद्र सानप,संजय गर्जेसह इतरांनी सुरु केलेल्या विधायक कामांचे कौतुक होत आहे.
एका शाळेत शिक्षण घेणारे सर्व विद्यार्थी पुढे नोकरी,व्यावसाय व शेतीसाठी वेगवेगळ्या दिशेला जातात.हेच सर्व सवंगडी पुन्हा एकत्र आले तर निश्चितच चांगलं घडतं.आम्ही स्नेह फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरु केलेले विधायक काम खुप आनंददायी आहे.
संगिता पिसाळ - जोरवर अध्यक्ष, स्नेह फाऊंडेशन




