Type Here to Get Search Results !

नेवासा - आधार फाऊंडेशनच्या वतीने विविध ठिकाणी खिचडी फराळाचे वाटप. | C24TAAS |

आधार फाऊंडेशनच्या वतीने विविध ठिकाणी खिचडी फराळाचे वाटप...

श्री क्षेत्र नेवासा येथे गुरुवर्य शिवाजी महाराज देशमुख यांच्या समवेत आधार फाउंडेशन महाराष्ट्र राज्य युवक कार्यकर्ते उपस्थित होते,



शंकर नाबदे, नेवासा : शिरेगाव येथील युवकांनी आधार फाउंडेशन च्या माध्यमातून व गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र नेवासा येथील माऊलींच्या दारी फराळाचे वाटप करण्यात आले, त्या ठिकाणी गुरुवर्य शिवाजी महाराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली खिचडी फराळाचे नियोजित वाटप करण्यात आले, या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत कमी लोकात फराळाचे वाटप करण्यात आले, तसेच तुकाराम महाराज संस्थान नेवासा येथे गुरुवर्य उद्धवजी महाराज मंडलिक यांच्या नियोजनाखाली त्या ठिकाणी खिचडी फराळाचे वाटप करण्यात आले, तसेच शिरेगाव येथे गुरुवर्य गोविंद बाबा भक्त मंडळाला व भजनी मंडळ यांनाही फराळाचे वाटप करण्यात आले, अशा एकूण तीन ठिकाणी फराळाचे नियोजित वाटप करण्यात आले, 


नेवासा तालुक्यातील बातम्यासाठी C24 तास WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/I36ibzSWvTDCnuzDjaFcGr
______________________________

Telegram वर ग्रुप जॉईन करा...👇

https://t.me/joinchat/S3zVPTU7uWIqFhgG

आधार फाऊंडेशनच्या सर्व युवकांनी अतिशय नियोजित पद्धतीने फराळाचे वाटप करण्यात आले, आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने कोरानाचे मोठे सावट असताना, अतिशय सुरक्षित पद्धतीने फराळाचे वाटप करण्यात आले, गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आधार फाउंडेशन, नेवासा तालुक्यात अहमदनगर जिल्ह्यात मोठे काम करत आहे, अतिशय चोख नियोजन करून मुलांनी फराळाचे वाटप करण्यात आले, यावेळी शिरेगाव व परिसरातील आधार फाउंडेशनचे सर्व युवक कार्यकर्ते उपस्थित होते, यावेळी श्री ज्ञानेश्वर संस्थानचे विश्वस्त हरिभक्त पारायण शिवाजी महाराज देशमुख तसेच तुकाराम महाराज संस्थांचे ह भ प गुरूवर्य उद्धवजी महाराज मंडलिक तसेच कोपरे ता राहुरी येथील शब्दप्रभू अंकुश महाराज जगताप यांनी आधार फाऊंडेशनच्या युवकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व आशीर्वाद दिले.



❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇