सुखदेव फुलारी यांना युवा प्रतिष्ठाणचा आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर.
शंकर नाबदे, नेवासा : नेवासा तालुक्यातील जेष्ठ पत्रकार व जलमित्र सुखदेव फुलारी यांना चिलेखनवाडी युवा बहुउद्देशीय प्रतिष्ठाणचे वतीने देण्यात येणारा आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर झाला आहे.
तालुक्यातील चिलेखनवाडी युवा बहुउद्देशीय प्रतिष्ठाणचे वतीने स्वर्गीय यादवराव यशवंत कांबळे यांचे स्मरणार्थ देण्यात येणारे ज्ञानसरिता पुरस्कार जाहीर झाले असून गुरुवार दि.29 जुलै रोजी दुपारी 3 वाजता महंत सुनीलगिरीजी महाराज यांचे हस्ते पुरस्कार वितरण व पुस्तक प्रकाशन करण्यात येणार असल्याची माहिती युवा बहुउद्देशीय प्रतिष्ठाणचे अध्यक्ष चंद्रकांत कांबळे यांनी दिली.
![]() |
युवा बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्रा.डॉ.संतोष तागड व सचिव प्रा.सुनील पंडित यांनी जाहीर केलेले पुरस्कार पुढील प्रमाणे...
सुखदेव फुलारी(आदर्श पत्रकार),सौ.उषाराणी देवगुणे-दहिकर (आदर्श तहसिलदार),उद्योजक बजरंग पुरी (समाजभूषण),अरुणराव मिसाळ (समाजकार्य),सुभाष सोनवणे (साहित्यरत्न),अरविंद पोटफोडे (आरोग्यदिप),चंद्रहास गवळी (कलाभूषण),रोहिणी चंद्रकांत जाधव (आदर्श आरोग्यसेविका)
https://chat.whatsapp.com/I36ibzSWvTDCnuzDjaFcGr
______________________________
Telegram वर ग्रुप जॉईन करा...👇
कथालेखन विजेते स्पर्धक...
सौ.योगिता गोर्डे (दौंड),सौ.साधना कुकडे (अ.नगर),सौ.सविता मुनीत (कुकाणा), शिवाजी काळे(श्रीरामपूर),आनंद काकडे(नगर),भास्कर बंगाळे(पंढरपूर).यावेळी प्रा. डॉ. संतोष तागड यांच्या 'मराठी साहित्य:काही संशोधन आणि निरीक्षणे' या संशोधन ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे.
महंत सुनीलगिरीजी महाराज यांचे हस्ते, जेष्ठ साहित्यीक प्रा. डॉ. बाबुराव उपाध्ये यांचे अध्यक्षतेखाली व पोलीस निरीक्षक विजय करे,जेष्ठ पत्रकार प्रकाश कुलथे,108 च्या उपजिल्हा व्यवस्थापक श्रीमती कांचन बिडवे, चिलेखनवाडीचे सरपंच भाऊसाहेब सावंत यांचे प्रमुख उपस्थितीत गुरूवार दि.29 जुलै रोजी दुपारी 3 वाजता श्रीराम साधना आश्रम, औरंगाबाद रोड (मुकिंदपुर) नेवासा फाटा येथे होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंद्रकांत कांबळे,उपाध्यक्ष प्रा.डॉ.संतोष तागड व सचिव प्रा.सुनील पंडित यांनी केले आहे.




