नेवासा - कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बरोबरच ग्रामसुरक्षा दल स्थापनेवर भर द्यावा - स.पो.नि.कर्पे.
शंकर नाबदे, नेवासा - कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बरोबरच ग्रामसुरक्षा दल स्थापनेवर गांव प्रतिनिधी यांनी भर द्यावा अशा सुचना सोनई पोलीस ठाण्याचे सपोनि रामचंद्र कर्पे पानेगाव येेेथील महादेव देवस्थान सभागृहात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी पानेगाव संस्थेचे अध्यक्ष जालिंदर जंगले हे होते.
सहाय्यक पोलीस निरीक्षक कर्पे बोलताना म्हटले की, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानुसार कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बरोबरच ग्रामसुरक्षा दल स्थापनेवर गावातील प्रतिनिधी यांनी भर द्यावा चोऱ्या, लुटमार करणारे अवैध धंदे वाले तसेच गावगुंड, यांना वठणीवर आणण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून मागील महिन्यापासून असा गुन्हेगारांवर वरिष्ठांचा आदेशानुसार गंभीर स्वरूपाचे कारवाया झाल्या असून सीसीटीव्ही कॅमेरे द्वारे असा लोकांवर नजर ठेवता येत असून कॅमेरेच्या अधारे झालेल्या गुन्ह्याचा तपास लावण्यासाठी मोठा उपयोग होत असुन तसेच ग्रामसुरक्षाचा माध्यमातून हि गावाला परीसरात मोठा फायदा होत असतो तसेच गावातील जमिनीचे बांधावरचे वाद,
गावातील वाद गाव पातळीवर मिटवण्यासाठी तंटामुक्ती समिती लक्ष देवून संबंधित पिडीतांना न्याय द्यावा तसे होत नसेल तर संबंधित जाणून बुजून शांतता भंग करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई पोलीस ठाण्याच्या माध्यमातून करण्यात येईल असा सुचना कर्पे यांनी या केल्या कोरोना काळात मुळाथडी परीसरात चांगल्या प्रकारे काम झाले असून त्यामध्ये पानेगाव करांचा विशेष गौरव यावेळी कर्पे यांनी करुन कोरोना अजून गेलेला नसून काळजी घेण्याचा सल्ला यावेळी त्यांनी दिला. यावेळी लोकनियुक्त सरपंच संजय पाटील जंगले यांनी दोन दिवसात सीसीटीव्ही कॅमेरे सुरु करुन लवकरच अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे ग्रामपंचायत माध्यमातून बसविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नेवासा तालुक्यातील बातम्यासाठी C24 तास WhatsApp group:
______________________________
Telegram वर ग्रुप जॉईन करा...👇
तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रय पाटील घोलप,पानेगाव संस्थेचे संचालक जालिंदर जंगले आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी पानेगाव संस्थेचे संचालक राजेंद्र जंगले, गोरक्षनाथ जंगले, उपाध्यक्ष अशोक गागरे, सुनिल चिंधे,संपत गुडघे, उपसरपंच-रामभाऊ जंगले, शिवप्रतिष्ठान अध्यक्ष किशोर जंगले, सुरेंद्र जंगले, विशाल जंगले,गुडधे महाराज, नामदेव गुडधे डॉ तुवर,दिपक जंगले, जनार्दन गागरे, पोलीस पाटील बाबासाहेब जंगले, गोपनीय विभागाचे वाघमोडे,बीट हवालदार लबडे, आदी संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते
सुत्रसंचालन पत्रकार- बाळासाहेब नवगिरे यांनी केले
आभार- पानेगाव संस्थेचे संचालक सुरेश जंगले यांनी मानले.

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇




