Type Here to Get Search Results !

नेवासा - जायकवाडी बँकवाटर पट्यातील शेतकरी बंधावाच्या सदैव सोबत ना.शंकरराव गडाख. | C24TAAS |

जायकवाडी बँकवाटर पट्यातील शेतकरी बंधावाच्या सदैव सोबत ना.शंकरराव गडाख.
ना गडाख यांच्या उपस्थितीत बॅकवॉटरमधील पाईपलाईनधारक शेतकरी व जायकवाडी अधिकारी यांची एकत्रित बैठक.


शंकर नाबदे, नेवासा - नेवासा तालुक्यातील घोगरगाव ते रामडोह  या बँकवाटर पट्ट्यातील गावामधील शेतकऱ्यांच्या  गोदावरी नदीपात्रामधून शेतीसाठी पाईपलाईन आहेत.या परिसरातील शेती पूर्णत: या पाईपलाइनच्या उपसा सिंचनावर अवलंबून आहेत.जायकवाडी पाटबंधारे विभागात या पाईपलाइन आहेत.पाणी परवाना नूतनीकरण करणे, पाणी पट्टी भरणे,पाणी परवाना वारसांच्या नावे हस्तांतर करणे, नवीन पाणी परवाना प्रस्ताव करणे,वीज कनेक्शन घेणे या कामांत शेतकऱ्यांची जायकवाडी पाटबंधारे विभागातील कालवा निरीक्षक,अधिकारी यांचेकडून पिळवणूक होत होती व मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत होती यामुळे जायकवाडी पट्ट्यातील शेतकरी बांधवात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.जायकवाडी पट्ट्यातील शेतकरी बांधवांची जायकवाडी पाटबंधारे अधिकाऱ्यांकडून होणारी गैरसोय थांबावी यासाठी ना शंकरराव गडाख यांनी पुढाकार घेत मुळा सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रावर शेतकरी व अधिकारी यांची बैठक आयोजित केली होती.

याप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना ना शंकरराव गडाख म्हणाले की जायकवाडी बँकवाटर पट्ट्यातील पाईपलाइन धारकांनी कुठल्याही अधिकाऱ्यांना पैसे देऊ नये ,कुणी पैसे  घेऊन शेतकऱ्यांची अडवणूक करत असेल तर शेतकऱ्यांनी मला थेट फोन करावा तसेच जायकवाडी बँकवाटर पट्ट्यातील शेतकऱ्यांची नवीन परवाना काढतांना व परवाना नुतनीकरण करतांना होणारी गैरसोय दूर व्हावी यासाठी यंत्रेणेमार्फत स्वतंत्र सेलची  निर्मिती करणार आहे त्यामुळे ज्यांना नवीन परवाना काढायचा असेल, परवाना नुतनीकरण करायचे असेल त्यांनी या सेलकडे कागदपत्रे जमा करावी मी व्यक्तिगत सदर परवाने मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहिल कुणाही अधिकाऱ्यास  पैसे देऊ नये मी सदैव जायकवाडी बँकवाटर क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहील कुणीही घाबरू नये कुणाचीही मोटार बंद होऊ देणार नाही असा धीर ना गडाख यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिला.यावेळी उपस्थित जायकवाडी उपसा सिंचन विभागाच्या उपस्थित अधिकारी व कालवा निरीक्षक यांनाही शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर सकारात्मक मार्ग काढत समन्वय साधत काम करण्याच्या सूचना दिल्या. शेतकऱ्यांनी  पैसे देऊ नये हे ना गडाख यांनी सांगताच उपस्थित शेतकऱ्यांनी त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दादासाहेब चिमणे यांनी केले तर याप्रसंगी श्रीरंग हारदे ,काकासाहेब शिंदे,आण्णासाहेब पटारे,डॉ करण घुले,जगन्नाथ कोरडे आदींनी मनोगत व्यक्त केले.

नेवासा तालुक्यातील बातम्यासाठी C24 तास WhatsApp group:
______________________________

Telegram वर ग्रुप जॉईन करा...👇

https://t.me/joinchat/S3zVPTU7uWIqFhgG


जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या वतीने अभिजित मेहत्रे अधीक्षक अभियंता जायकवाडी लाभ क्षेत्र यांनी उपस्थित शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्याची ग्वाही ना गडाख यांच्या समक्ष उपस्थित शेतकऱ्यांना दिली.कोरोना नियमांचे पालन करून सदर कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर नानासाहेब तुवर ,कडुबाळ कर्डीले,दादासाहेब शेळके जी प सदस्य,नानासाहेब नवथर,ऍड बन्सी सातपुते, गणेश ढोकणे, बाळासाहेब पाटील,रवींद्र शेरकर,कैलास झगरे,संदीप सुडके, अझर शेख,सुनील नजन,पी बी जाधव कार्यकारी अभियंता पैठण,अविनाश पांडुळे उपविभागीय अधिकारी जायकवाडी सिंचन प्रकल्प आदींसह घोगरगाव, बेलपिंपळगाव, गोधेगाव, प्रवरासंगम,मंगळापूर ,गळनिंब, गोगलगाव, सलाबतपुर, शिरसगाव, वाकडी,रामडोह आदीसह विविध गावांतील शेतकरी उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी कुणालाही पैसे देऊ नये.
जायकवाडी बँकवाटर पट्यात शेतकऱ्यांकडून पैसे घेतले जात आहे याबाबत माझ्याकडे तक्रारी आल्या आहेत .एकाही शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना पैसे द्यायचे नाही तुम्हाला कुणी पैसे मागितले तर तात्काळ मला संपर्क करा . शेतकऱ्यावर पैसे घेऊन दबाव टाकून अन्याय केल्यास त्या अधिकाऱ्याची गय केली जाणार नाही असे मृद व  जलसंधारण मंत्री ना शंकरराव गडाख यांनी बैठकीत बोलताच शेतकऱ्यांनी टाळ्याचा कडकडाट केला.


❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇