पाबळ येथे कृषी विद्यार्थ्यांनीचे शेतीविषयक प्रात्यक्षिके
पाबळ प्रतिनिधी 【सुनिल पिंगळे 】 - महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय कोल्हापूर येथील कृषी विद्यार्थ्यांनी कुमारी ऋतुजा शिवाजी बगाटे हिने ग्रामीण कृषी जागरूकता व औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम 2021-2022 च्या अभ्यास दौ-या दरम्यान शिरूर तालुक्यातील पाबळ येथील शेतकऱ्यांना शेतीविषयक आधुनिक माहिती व शास्त्रशुद्ध पद्धतीने शेती कशी करावी याबद्दल सविस्तर मार्गदर्शन व माहिती दिली. यामध्ये प्रामुख्याने पिढ्यानपिढ्या चालत असलेले शेती व्यवसाय व त्यांच्या उत्पादनात दिवसोदिवस होत असलेले विक्रमी घट पहाता शेती मध्ये नवानवीन प्रयोग करणं महत्त्वाचे आहे यामध्ये माती परिक्षणाचे महत्त्व, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आधुनिक पद्धतीने शेती कशी करावी, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, पिकांवर आवश्यक असणारी सेंद्रिय खते, औषध यांचा योग्य व समप्रमाणात वापर कसा करावा याविषयावर चर्चासत्रे व प्रात्यक्षिके घेण्यात आली.तर शेतीशी निगडित असणारी व शेतीच्या बांध्यावर कोणत्या उपयुक्त प्रकारची वृक्ष लागवड कशा पध्दतीने करावी याविषयवर मार्गदर्शन करण्यात आले तसेच ग्रामीण भागातील महिलांनासाठी घरच्या घरी खाद्यपदार्थ तयार करून त्यांची साठवणूक जपणूक कशी करावी व त्यांचे जीवनमान जास्त प्रमाणात कसे वाढवावी व त्यातील जीवनसत्त्वे कमी न होता ती जास्त दिवस कशी टिकुन राहतील व याबाबतीत सखोल माहिती व मार्गदर्शन करण्यात आले सध्या तरी आता कृषी महाविद्यालांच्या माध्यमातून या कृषीकन्या आधुनिक शेती विषयाकडे वळलेले असुन याविषयावर सखोल अभ्यास करुन त्यावर रिसर्च करुन ग्रामीण भागातील शेतकरी वर्गासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत शेती करणाऱ्या शेतकरी वर्गासाठी उपयोगात आणत आहेत. या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर नक्कीच ग्रामीण भागातील शेतकरी नाविन्यापूर्ण प्रयोग करण्यासाठी उपयोगी ठरणारा असुन पाबळ परिसरातील या उपक्रमामुळे या भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी नक्कीच मदत होणारा आहे, त्यामुळे या भागातील शेतकरीवर्ग या शेतीविषयक प्रात्यक्षिकेमुळे या कृषीकन्या प्रती धन्यवाद व्यक्त करत आहेत
तर यावेळी या कार्यक्रमासाठी कोल्हापूर येथील डॉ. यु.बी.होले सहयोगी अधिष्ठाता राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय कोल्हापूर कार्यक्रम समन्वयक डॉ. बी.टी.कोलगणे कृषी विस्तार आणि संवाद प्राध्यापक डॉ. आर.आर घासुरे केंद्र प्रमुख, प्राध्यापक सी.व्हि.मेमाणे कार्यक्रम अधिकारी व इतर विषय तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभाले असल्याची माहिती कुमारी ऋतुजा शिवाजी बगाटे यांनी दिली असुन
या माझ्या आधुनिक शिक्षणाचा,तंत्रज्ञानाचा फायदा जास्तीत जास्त ग्रामीण भागातील शेतकरी वर्गासाठी यापुढे करणारा असल्याची माहिती ऋतुजा बगाटे या कृषीकन्या यांनी
दिली तर यावेळी संतोष राघू फुटाणे,अशोक गंगाराम बगाटे,तुळशीराम गंगाराम बगाटे, शकुंतला किसन फुटाणे ,संध्या राजाराम बगाटे , किसन दत्तू सावंत,शिवाजी रामदास बगाटे,दयानंद हरिश्चंद्र बगाटे,अनिल बाळासाहेब बगाटे,ऋतुजा शिवाजी बगाटे इत्यादी शेतकरी व महिला वर्ग उपस्थित होते.
