पाबळ येथे कृषी कन्येचे आगमन आणि शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन
पाबळ प्रतिनिधी 【सुनिल पिंगळे】 शिरूर तालुक्यातील पाबळ येथे कृषी महाविद्यालय लोणी येथील कृषी कन्येचे पाबळ येथे आगमन झाले असुन यावेळी पाबळ येथील पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी या कृषी कन्येचे स्वागत केले आहे
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था व महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्नित
कृषी महाविद्यालय लोणी येथे शिक्षण घेत आहे संस्थेचे कृषी शिक्षण संचालक भारत घोगरे, प्राचार्य निलेश दळे कार्यक्रम समन्वयक प्रा.आर ए.दसपुते व प्रा.प्रियांका दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीकन्या चौधरी आरती रोहिदास ही पाबळ येथील शेतकऱ्यांचे अनुभव जाणुन घेत त्यांना मार्गदर्शन करणार आहे दहा आठवड्यातील कालावधीत चालणाऱ्या या कार्यक्रमात च्या दरम्याता शेतातील माती परिक्षण, फळबाग लागवड, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन ,बीजप्रक्रिया,आधुनिक शेतीचे आर्थिक नियोजन, दुभत्या व इतर जनावरांचे लसीकरण आदींबाबत शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार असुन आधुनिक शेतीच्या तंत्रज्ञानविषयी जनजागृती करणार आहे
तर आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृतीचा शुभारंभ पाबळ येथे पाबळ गावाचे प्रथम नागरिक विद्यामान सरपंच श्री. मारुतीशेठ शेळके, उपसरपंच राजाराम वाघोले,पाबळ येथील भैरवनाथ कृषी सेवा केंद्रचे आण्णासाहेब जाधव पाटील,माजी सैनिक मेजर सुनिल चौधरी,सुनिल जाधव अविनाश चौधरी, नामदेव चौधरी,काँमन सव्हिस सेंटरचे विनायक बांगर, हिराजी चौधरी,प्रकाश बगाटे,गोसावीबाबा दुध डेअरीचे चेअरमन आनंथा वाबळे पाबळ कृषी विभागाचे कृषी अधिकारी कोरडे साहेब आदि मान्यवर उपस्थित होते या अभ्यास दौऱ्याच्या माध्यमातून नवानवीन शेती विषयावर चर्चा होणार असुन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती विषयावर मार्गदर्शन होणार आहे
तर या 2021-2022 च्या अभ्यास दौ-या दरम्यान शिरूर तालुक्यातील पाबळ येथील शेतकऱ्यांना शेतीविषयक आधुनिक माहिती व शास्त्रशुद्ध पद्धतीने शेती कशी करावी याबद्दल सविस्तर मार्गदर्शन व माहिती दिली जाणार आहे यामध्ये प्रामुख्याने पिढ्यानपिढ्या चालत असलेले शेती व्यवसाय व त्यांच्या उत्पादनात दिवसोदिवस होत असलेले विक्रमी घट पहाता शेती मध्ये नवानवीन प्रयोग करणं महत्त्वाचे आहे यामध्ये माती परिक्षणाचे महत्त्व, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आधुनिक पद्धतीने शेती कशी करावी, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, पिकांवर आवश्यक असणारी सेंद्रिय खते, औषध यांचा योग्य व समप्रमाणात वापर कसा करावा याविषयावर चर्चासत्रे व प्रात्यक्षिके घेण्यात येणार आहे तर शेतीशी निगडित असणारी व शेतीच्या बांध्यावर कोणत्या उपयुक्त प्रकारची वृक्ष लागवड कशा पध्दतीने करावी व जास्तीत जास्त उत्पादन देणारे फळवर्गिया झाडाची लागवड याविषयवर शेतीतज्ञ प्राध्यापकाचे मार्गदर्शन आँनलाईन होणार आहे तर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने शेती विषय तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन शेतकरी वर्गाला लाभाले असल्याची माहिती कुमारी चौधरी आरती रोहिदास हिने दिली असुन या माझ्या आधुनिक शिक्षणाचा,तंत्रज्ञानाचा फायदा जास्तीत जास्त माझ्या गावातील ग्रामीण भागातील शेतकरी वर्गासाठी यापुढे करणारा असल्याची माहिती आरती चौधरी या कृषीकन्या यांनी दिली तर त्यांच्या या निर्णयाचे पाबळ येथील शेतकऱ्यांना स्वागत केले आहे
