केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री ना.नितीनजी गडकरी यांच्या हस्ते लेखक अशोकराव टाव्हरे लिखित "हायवे ऑफ डेव्हलपमेंट " या पुस्तकाचे प्रकाशन दिल्ली येथे संपन्न
प्रतिनिधी 【सुनिल पिंगळे पाबळ】 केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री ना.नितीनजी गडकरी यांच्या हस्ते लेखक अशोकराव टाव्हरे लिखित "हायवे ऑफ डेव्हलपमेंट " या पुस्तकाचे प्रकाशन परिवहन भवन नवी दिल्ली येथे झाले.यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी यांचे खाजगी सचिव,आय.एस.एस.अधिकारी व निमगाव ता.खेडचे सुपुत्र संकेत भोंडवे उपस्थित होते.
लेखक अशोकराव टाव्हरे हे कनेरसर ता.खेड येथील रहिवासी आहे.त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यावर आधारित" विकासाचा राजमार्ग "या पुस्तकाच्या दोन आवृत्त्या प्रकाशित केल्या आहेत.गडकरी साहेबांनी इंग्रजी पुस्तकासाठी लेखी परवानगी दिली होती.
१९७६ पासूनचे अभाविप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजयुमो ,भाजपचे प्रदेशाध्यक्ष ते राष्ट्रीय अध्यक्ष, विधानपरिषद सदस्य ते विरोधी पक्षनेते,महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ते केंद्रातील सर्वात कार्यक्षम मंत्री हा प्रवास लेखक अशोकराव टाव्हरे यांनी पुस्तकातून उलगडला असून गडकरी यांनी पुस्तकाचे कौतुक केले असून त्याद्वारे त्यांच्या मंत्रालयाचे कार्य आम जनतेपर्यंत जाण्यास मदत होईल असे मत व्यक्त केले.
