Type Here to Get Search Results !

शिक्रापूर - कोविड प्रमाणपत्र आता मिळणार व्हॉट्सअ‍ॅॅपवर | C24TAAS |.

शिक्रापूर - कोविड प्रमाणपत्र आता मिळणार  व्हॉट्सअ‍ॅपवर

शिक्रापूर प्रतिनिधी 【सुनिल पिंगळे】 - देशात लसीकरण झालेल्या व्यक्तीला तत्काळ कोविड पोर्टलवरुन लस प्रमाणपत्र प्राप्त होते. मात्र, आता हे लस प्रमाणपत्र मिळणे आणखी सोपे होणार आहे. नेहमी संपर्कासाठी वापरल्या जाणा-या व्हॉट्सपवर आता अवघ्या काही सेंकदात लस प्रमाणपत्र मिळणार आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी दिली आहे.

      देशात सध्या कोरोनाच्या तिस-या लाटेचे संकट उभे ठाकले आहे. निव्वळ भारतच नव्हे तर संपूर्ण जगातच कोरोना संसर्गाने धुमाकूळ घातला आहे. सध्यातरी कोरोना संसर्गावर कसल्याही प्रकारचे औषध उपलब्ध नाही  मात्र, वेगवेगळ्या देशांनी लस उपलब्ध करुन दिल्या आहेत. भारतात देखील १६ जानेवारीपासून लसीकरणास प्रारंभ करण्यात आला आहे. आतापर्यंत ५० कोटींच्या वर डोस दिले गेले आहेत. जॉन्सन अँड जॉन्सन या लसीला नुकतीच आपत्कालीन वापरासाठी मंजूरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता भारतात पाच लसी उपलब्ध झाल्या आहेत मनसुख मांडवीय यांनी ट्विट करत म्हटले आहे की, तंत्रज्ञानाचा वापर करून सामान्य माणसाच्या जीवनात क्रांती घडवत आहोत़ आता कोरोना लस प्रमाणपत्र आपल्याला व्हॉटसअ‍ॅपवरुन अवघ्या काही क्षणात मिळणार आहे. तीन सहजसोप्या स्टेप्सनंतर आपल्याला हे प्रमाणपत्र मिळेल.

अशा पध्दतीने करा व्हॉट्सअ‍ॅपवर

 टाईप प्रमाणपत्र आणि प्रमाणपत्र मिळावा

 1】 ९०१३१५१५१५हा संपर्क क्रमांक आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करा

2】 त्या क्रमांकावर कोविड सर्टिफिकेट व्हॉट्सअ‍ॅपवर असे टाईप करुन पाठवा

3】 त्यानंतर आलेला ओटीपी टाका

– अवघ्या काही सेकंदात आपल्याला आपले लस प्रमाणपत्र प्राप्त होईल.

अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी ट्विट करत म्हटले आहे त्यामुळे आता सर्वसामान्य माणसाला हे प्रमाणपत्र सहज डाऊनलोड करुध घेता येईल


प्रतिनिधी सुनिल पिंगळे पाबळ शिक्रापूर

Tags