Type Here to Get Search Results !

युटेक शुगर ने ऊसाचे पेमेंट थकवल्याने शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या दारात पेटवून घ्यायचा केला प्रयत्न.

 युटेक शुगर ने ऊसाचे पेमेंट थकवल्याने शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या दारात पेटवून घ्यायचा केला प्रयत्न 

नेवासा तालुक्यातील नांदूर शिकारी कुकाने जेऊर वरखेड व परिसरातील तसेच तालुक्यातील शेतकर्यांच्या  चालू गळीत हंगामातील ऊसाचे पेमेंट संगमनेर तालुक्यातील कौठे मलकापूर येथील युटेक शुगर या खाजगी कारखान्याने थकवल्याने शेतकर्यांनी रविवारी दुपारी 2 वाजेच्या दरम्यान आंदोलनाचा पवित्रा घेत कारखाना जनरल मॅनेजर बी एन पवार यांना धारेवर धरत चांगलेच खडसावत शेतकऱ्यांना पेमेंट बाबत मात्र कारखाना व्यवस्थापनाने ठोस उत्तर दिले नसल्याने युवा मोर्चाचे अध्यक्ष सतीश कर्डीले छावा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष संजय पवार शंकर लिपणे नवनाथ  म्हसरूप  यांनी कारखाना कार्यलयाच्या दारातच पेटवून घेण्याचा प्रयत्न केला असल्याने गरबडलेल्या व्यवस्थापनाने सोमवारी सकाळी च पेमेंट जमा करण्याचे आश्वासन दिल्याने शेतकरी व व्यवस्थापन चा वाद निखळला याबाबत सविस्तर माहिती अशी की जानेवारी फेब्रुवारी मार्च,एप्रिल महिन्यात गेलेल्या 

   ऊसाचा शेतकर्यांना अजून एक  रुपये देखील  मिळाला नाही कारखाना व्यवस्थापनचे अध्यक्ष बिरोले हे उडवा-उडवीचे उत्तरे देऊन शेतकर्यांना अपमानित करतात तुम्ही कार्यालयाशी संपर्क करा माझ्याशी बोलण्याचा तुमचा काही संबंध नसल्याचे उत्तरे देऊन शेतकर्यांना हताश करतात ? मग शेतकर्यांनी न्याय कोणाकडे मागायचा ?      शेतकर्यांना कारखाना प्रशासनाकडून उडवा-उडवीची उत्तरे मिळत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.तालुक्यात उसाचा प्रश्न अतिरिक्त झाल्याने शेतकऱ्यांनी या खासगी कारखान्याला ऊस दिला होता 


नेवासा तालुक्यातील कुकाने नांदूर शिकारी जेऊरहैबती व परिसर हा ज्ञानेश्वर व मुळा कारखान्याचे कार्यक्षेत्र व ऊसाचे आगार म्हणून ओळखला जातो.मागील वर्षी पाऊसाचे प्रमाण जास्त असल्याने ऊसाचे क्षेत्र वाढले यामुळे या भागातील शेतकर्यांनी बाहेरील कारखान्यास ऊस दिला. संगमनेर तालुक्यातील कौठे-मलकापूर येथे अस्तित्वात असलेल्या युटेक शुगर या खाजगी साखर कारखान्यास ही शेतकर्यांनी आपला ऊस दिला, परंतु जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल महिन्यात गेलेल्या ऊसाचे अजून देखील पेमेंट या कारखाना व्यवस्थापनाने जमा केले नाही. 

नेवासा तालुक्यातील बातम्यासाठी C24 तास WhatsApp group:
https://chat.whatsapp.com/I36ibzSWvTDCnuzDjaFcGr
______________________________

Telegram वर ग्रुप जॉईन करा...👇

https://t.me/joinchat/S3zVPTU7uWIqFhgG

पुढील पिके घेण्यासाठी, मुलीच्या लग्नासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी,दावखान्यासाठी पैशाची अत्यंत गरज असतांनी वर्षभर कष्टाने पिकवलेल्या पिकांचे पैसे कारखाना देत नसल्याने शेतकर्यांना व्याजाने पैसे घेऊन आपली गरज पूर्ण करावी लागत आहे. याबाबत कारखाना प्रशासन, कारखान्याचे चेअरमन यांच्याशी शेतकर्यांनी वेळो-वेळी संपर्क साधला तर उद्या पेमेंट करतो परवा करतो म्हणून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहे.यामुळे याबाबत आपण कोणाकडे न्याय मागावा या चिंतेत शेतकरी पडला आहे. रब्बीच्या बी भरणासाठी व मुलांच्या शिक्षणासाठी तीन ते चार दिवसांमध्ये आमचे पैसे मिळाले नाही तर आम्ही सर्व शेतकरी कारखान्यावर जाऊन सामुहिक आत्मदहन करणार असल्याचे त्यांनी प्रसिद्ध दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.यामुळे आता तरी कारखाना प्रशासनाला जाग येऊन शेतकर्यांचे पैसे मिळतील का?हा महत्त्वाचा प्रश्न आहे

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇