Type Here to Get Search Results !

नेवासा - गुणवंत विद्यार्थिनींचा लोकनेते स्वर्गीय मारुतराव घुले पाटील पतसंस्थेच्या वतीने सन्मान.

लोकनेते स्वर्गीय मारुतराव घुले पाटील पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थिनींचा सन्मान.

गुणवंत विद्यार्थिनींचा केलेला गौरव हा स्त्री शक्तीचा सन्मान वाढविणारा-नंदकुमार पाटील

नेवासा - इयत्ता बारावीच्या परीक्षेत विशेष गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थिनींचा लोकनेते स्वर्गीय मारुतराव घुले पाटील पतसंस्थेच्या वतीने सत्काराद्वारे गौरव करून सन्मान करण्यात आला. शैक्षणिक वाटचाल करत असतांना मुलींना देखील जीवनात उंच भरारी घेता यावी,त्यांचे मनोधैर्य उंचवावे यासाठी स्त्री शक्तीचा सन्मान वाढविण्यासाठी हा केलेला गौरव त्यांना प्रेरणा देत राहील असे प्रतिपादन पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी यावेळी बोलतांना काढले.


   ऊसाचा शेतकर्यांना अजून एक  रुपये देखील  मिळाला नाही कारखाना व्यवस्थापनचे अध्यक्ष बिरोले हे उडवा-उडवीचे उत्तरे देऊन शेतकर्यांना अपमानित करतात तुम्ही कार्यालयाशी संपर्क करा माझ्याशी बोलण्याचा तुमचा काही संबंध नसल्याचे उत्तरे देऊन शेतकर्यांना हताश करतात ? मग शेतकर्यांनी न्याय कोणाकडे मागायचा ?      शेतकर्यांना कारखाना प्रशासनाकडून उडवा-उडवीची उत्तरे मिळत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.तालुक्यात उसाचा प्रश्न अतिरिक्त झाल्याने शेतकऱ्यांनी या खासगी कारखान्याला ऊस दिला होता 


लोकनेते मारुतराव घुले पाटील सभागृहात छोटेखानी पद्धतीने पार पडलेल्या गुणवंतांचा गौरव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे अध्यक्ष नंदकुमार पाटील होते

तर जेष्ठ विधी तज्ञ अँड.गोरक्षनाथ काकडे,संस्थेचे उपाध्यक्ष महंमदभाई शेख, मित्र परिवार तरुण मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब पारखे,प्रा.देविदास साळुंके,प्रा.अजय पाटील,माजी उपसरपंच अभिजित मापारी,अँड.दीपक गायकवाड,नंदू कोरेकर, काशिनाथ कदम,संजय कदम, विलास आरले,अभय वाघ,पतसंस्थेचे व्यवस्थापक अंकुश धनक यावेळी उपस्थित होते.

नेवासा तालुक्यातील बातम्यासाठी C24 तास WhatsApp group:
https://chat.whatsapp.com/I36ibzSWvTDCnuzDjaFcGr
______________________________

Telegram वर ग्रुप जॉईन करा...👇

https://t.me/joinchat/S3zVPTU7uWIqFhgG

यावेळी कला शाखेत अमृता संजय कदम ९२ टक्के, वाणिज्य शाखेत साक्षी अभय वाघ ९३ टक्के,विज्ञान शाखेत श्रेया अभिजीत मापारी ८७ टक्के यांनी विशेष यश संपादन केल्याबद्दल त्यांचा प्रमुख अतिथींच्या हस्ते पुस्तक पुष्पगुच्छ,शाल श्रीफळ व पेन भेट देऊन गौरव करण्यात आला.मित्र परिवार मंडळाच्या वतीने ही विद्यार्थिनीचा सन्मान करण्यात आला.

यावेळी अँड.गोरक्षनाथ काकडे,प्रा.देविदास साळुंके, पत्रकार सुधीर चव्हाण यांनी मोलाचे मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आपण केलेल्या सत्कारामुळे आमचे मनोबल वाढले असून त्यासाठी एक वेगळी ऊर्जा आम्हाला मिळाली असल्याचे कु.अमृता कदम,कु.साक्षी वाघ,कु.श्रेया मापारी यांनी आपल्या मनोगतात भावना व्यक्त केल्या.

पतसंस्थेचे अध्यक्ष नंदकुमार पाटील म्हणाले की माऊलींच्या भूमीतील या लेकीं उंच भरारी घेऊन नेवासे नगरीचे व आपल्या आईवडिलांचे नाव जीवनात मोठे करतील जिद्द व चिकाटी अंगी बाळगून तसेच अध्ययनावर भर देत पुढील काळात यशस्वी घोडदौड यशस्वी विद्यार्थींनींनी करावी अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी बोलतांना दिल्या.पतसंस्थेचे लक्ष्मणराव नाबदे यांनी सूत्रसंचालन केले तर उपाध्यक्ष महंमदभाई शेख यांनी उपस्थितांचे आभार मानले.

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇