नेवासा - अवैध ऱित्या कत्तलखान्यासाठी घेऊन जाण्याचे बेतात असलेले 10 गोवंशीय जनावरांची सोनई पोलीसांनी केली सुटका.| C24Taas|
( शंकर नाबदे ) नेवासा - सोनई पोलीस स्टेशनचे सहा पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांना मिळालेले गोपनीय बातमीवरुन त्यांचे आदेशानुसार सोनई पोलीसांचे पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी 14/30 वा शास्त्रीनगर गाढवे वस्ती जवळ चांदा ता नेवासा येथे छापा टाकला असता सदर ठिकाणी काही इसम हे त्यांचेकडील अशोक लेलंन्डचा टेम्पो मध्ये गोवंशीय जनावरे भरत असताना मिळुन आले टेम्पोमध्ये 5 जनावरे ही खचाखच अखुड दोरखंडाने बांधलेली होती.काही जनावरे ही जवळच असलेले पत्र्याचे गोठ्यामध्ये अव्यवस्थीतपणे अखुड दोरखंडाने बांधलेली मिळुन आली. गोवंशयी गायी असे टेम्पो मध्ये खचाखच भरलेली काही गुरे ही गोठ्यामध्ये अव्यवस्थीत रित्या भरुन ,त्यांना क्रुरतेने अखुड दोरखंडाने बांधुन,चारा पाणी ,वैद्यकीय सोयी, .पुरेसा अन्न पाणी यांची सोय केलेली नव्हती.देखभाल न करता क्रुरतेने जनावरे बांधलेले स्थितीत आढळुन आली.
Telegram👇ग्रुप जॉईन करा..
घटनाठिकाणी छाप्याध्ये वरील एकुण 10 गोवंशीय जणावरे त्यात गायी विविध रंगाची व वयाची त्यात काही अशक्त.अजारी असलेली अशा विविध रंगाची एकुण 10 जनावरे ही कत्तलीसाठी गाड्यात भरत असताना जणावरांचा मालक व टेमपो चालक हे पोलीसांची चाहुल लागताच पळुन गेली .शेजारी विचारपुस केली असता सदरची जणावरे ही अताऊला शब्बीर पठाण रा चांदा ता नेवासा यांची असल्याचे निष्पंन्न झाले. सदर ठिकाणा वरुन खालील प्रमाणे मुद्देमाल हा जागीच जप्त करण्यात आला आहे.
1) 1,53,000/- रु किं च्या विविध रंगाचे गाय असे गोवंशीय जनावरे वेगवेगळ्या वयाची एकुण 10 जनावरे
2) 4,50,000/-रु किं चे सदर जनावरे वहातुकीसाठी वापरण्यात आलेला अशोक लेलंन्ड टेम्पो क्रमांक MH20EL7833 असा एकुण 6,03,000/- रु किं चा मुद्देमाल घटनास्थळी जप्त करण्यात आला.
शास्त्रीनगर गाढवे वस्ती चांदा येथुन वरील आरोपी इसमांचे कब्जातुन मुक्तता केलेली 10 गोवंशीय जनावरांना तातडीने सुरक्षा ,देखभाल व संवर्धन पालनपोषणासाठी जप्तीची कारवाई नंतर लागलीच जय गोमाता सेवाभावी संस्था ,वृध्देश्वर मढी ता पाथर्डी येथे सुरक्षीत रित्या पाठविण्यात आली आहेत.
नेवासा तालुक्यातील बातम्यासाठी C24 तास WhatsApp group:
पसार झालेला जनावरांचा मालक अताऊला शब्बीर पठाण रा चांदा ता नेवासा व टेम्पो क्रमांक MH-20-EL7833वरील अज्ञात चालक यांचे विरुध्द सोनई पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजी. क्र. 300/2021 महा.प्राणी संरक्षण (सुधारित)अधि.1995 चे कलम 5(ब),(क) सह प्राण्यांना क्रुरतेने वागविण्यास प्रति.कायदा 1960 चे कलम 11 सह मो.वा.का.क.192(अ) प्रमाणे दिनांक 04/09/2021 रोजी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇



