नेवासा : 'मुळा' चे 15 लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट, नोव्हेंबरपासून इथेनॉल प्रकल्प सुरू होणार - नानासाहेब तुवर !| C24Taas|

Telegram👇ग्रुप जॉईन करा..
https://t.me/joinchat/S3zVPTU7uWIqFhgG
नेवासा ( शंकर नाबदे ) : मुळा कारखान्याचा गळीत हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे नियोजन असून सध्या अंतिम टप्प्यात असलेला इथेनॉल प्रकल्प ही येत्या नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर यांनी दिली.
शनिवारी 25 सप्टेंबर रोजी मुळा कारखान्यावर झालेल्या ऑनलाईन वार्षिक सभेत ते बोलत होते. याप्रसंगी उपाध्यक्ष कडुबाळ कर्डिले व सर्व संचालक उपस्थित होते. कारखान्याचे कार्यकारी संचालक एस एस बेल्हेकर व अधिकारी वर्ग उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीस अहवाल वर्षात दिवंगत झालेल्या व्यक्ती तसेच कारखान्याचे सभासद ऊस उत्पादक अधिकारी व कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
संबंधित अधिकाऱ्यांनी विषयपत्रिकेवरील सर्व विषयांची सविस्तर माहिती दिली.
त्यावर ऑनलाइन सभेत सहभाग घेतलेल्या सभासदांनी केलेल्या सूचना विचारात घेऊन सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली.मागील हंगामाचा आढावा घेताना अध्यक्ष तुवर म्हणाले की उसाचे अतिरिक्त उत्पादन झाले असले तरी ऊस संपेपर्यंत गाळप हंगाम चालू ठेऊ व कोणताही ऊस गाळपा विना शेतात उभा राहणार नाही असा शब्द मंत्री शंकरराव गडाख यांनी दिला होता तो शब्द संचालक मंडळाने पाळला आहे. जवळपास १८३ दिवस कारखाना चालवला कारखान्याने यापूर्वी केलेल्या उपाययोजनांमुळे रोज सात ते आठ हजार टन गाळप घेऊन २ मे रोजी सर्व उसाचे गाळप पूर्ण करण्यात आले जवळपास १३ लाख टनाचे ऊस गाळप करण्यात आले ३४ कोटी ची वीज निर्मिती केली २१ कोटीची अल्कोहोल निर्मिती झाली.
नेवासा तालुक्यातील बातम्यासाठी C24 तास WhatsApp group:
मागील हंगामात अतिरिक्त उसामुळे साखरेचे उत्पादनही अतिरिक्त झाले मात्र दर महिन्याला साखर विक्रीच्या जो कोठा येत होता त्याप्रमाणे विक्री झाली नाही. साखर मंदीच्या भोवऱ्यात सापडली एक तर क्विंटलला ३७०० रुपये खर्च येत असताना शासनाने मात्र ३१०० रुपये किंमत ठरवली वारंवार मागणी करूनही त्यात वाढ केली नाही आणि आहे त्या भावात साखर विकली जात नव्हती त्यात कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी जे वारंवार छोटे मोठे लाॅकडाऊन जाहीर करण्यात आले त्याचा सर्वाधिक परिणाम साखर धंद्यावर झाला व साखर कारखान्यांच्या अडचणीत वाढ झाली
तुवर पुढे म्हणाले की केंद्र शासनाकडून बफर स्टॉकचे क्लेम आणि निर्यात साखरेचे अनुदानही मिळाले नाही मात्र अशाही परिस्थितीत कारखान्याने जवळपास अकरा कोटीच्या दीर्घ मुदत कर्जाची परतफेड केली सभासदांना पाच कोटीची ठेव परत केली उसाची एफआरपी २०७६ निघत असताना त्या ऐवजी २१०० रूपाने सर्व ऊस उत्पादकांना पेमेंट करण्यात आले ईथेलाॅन प्रकल्पाबाबत बोलताना अध्यक्षांनी सांगितले कि कारखान्याने हाती घेतलेल्या ७० कोटी रुपये खर्चाच्या व दैनिक ४५ हजार लिटर उत्पादन क्षमतेच्या इथेनॉल प्रकल्पाचे काम कारखान्याचे मार्गदर्शक व राज्याचे मृद संधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली अंतिम टप्प्यात आलेले असून येत्या नोव्हेंबरपर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे उसाचा ज्यूस किंवा सिरप व बी हेवी मोलेसेस पासून इथेलाॅनची निर्मिती केली जाणार असून त्याचे दर शासनाने निश्चित केले असल्याने व त्यासाठी ठरलेल्या मुदतीत पेमेंट मिळत जाणार असल्याने अनेक दिवसांपासून कारखान्याची होत असलेली आर्थिक कोंडी फुटण्यास काही प्रमाणात मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तेरीज ताळेबंद व अहवाल वाचन हेमंत दरंदले यांनी केले.
❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇