Type Here to Get Search Results !

नेवासा : नेवासा नगरीत ग्रंथराज ज्ञानेश्वरीची जयंती साजरी !| C24Taas|

नेवासा : नेवासा नगरीत ग्रंथराज ज्ञानेश्वरीची जयंती साजरी !| C24Taas|

विश्वाला तत्वज्ञान देणाऱ्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीची जयंती राजमान्यतेनुसार साजरी व्हावी - ह.भ.प. शिवाजी महाराज देशमुख


Telegram👇ग्रुप जॉईन करा..

https://t.me/joinchat/S3zVPTU7uWIqFhgG


नेवासा ( शंकर नाबदे ) : संत ज्ञानेश्वर माऊलींची कर्मभूमी नेवासेनगरीत ग्रंथराज ज्ञानेश्वरीची जयंती सोमवारी दि.२७ सप्टेंबर रोजी तिथीनुसार साजरी करण्यात आली. 

विश्वाला तत्वज्ञान देणाऱ्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीची जयंती राजमान्यतेनुसार वैभवशाली पद्धतीने साजरी व्हावी

त्यादृष्टीने शासनाने निर्णय व्हावा अशी अपेक्षा संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानचे प्रमुख मार्गदर्शक ह.भ.प.शिवाजी महाराज देशमुख यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केली.


पुणे येथील संत सेवा संघ व संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या जयंतीच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर माऊलींचे मूर्तिमंत रूप असलेल्या पैस खांबासह ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पूजन गुरुवर्य शिवाजी महाराज देशमुख यांच्या हस्ते "ज्ञानोबा माऊली तुकाराम" ..."पुंडलिक वरदा हरी ...विठ्ठल.. श्री ज्ञानदेव तुकाराम" असा जयघोष करत करण्यात आले.
यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज भक्त मंडळाच्या वतीने
पत्रकार सुधीर चव्हाण यांनी आलेल्या संतसेवकांचे स्वागत केले तर डॉ.करणसिंह घुले यांनी प्रास्ताविक केले.
उपस्थित मान्यवर मंडळींच्या हस्ते ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पूजन पुष्प अर्पण करून करण्यात आले.तर संत सेवा संघाचे सूरज शिंगण यांनी ग्रंथराज ज्ञानेश्वरी जयंतीचे महत्व सांगून मंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली.

नेवासा तालुक्यातील बातम्यासाठी C24 तास WhatsApp group:

यावेळी ह.भ.प.शिवाजी महाराज देशमुख म्हणाले की
विश्वाला तत्वज्ञान देणाऱ्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीची जयंती राजमान्यतेद्वारे वैभवशाली पद्धतीने साजरी व्हावी अशी वारकरी संप्रदायातील प्रत्येक वारकऱ्यांची इच्छा असून त्यासाठी सर्वांनी हातात हात घालून राज मान्यतेसाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सांगून ज्ञानेश्वरी ही पहिल्यापासूनच शुद्ध होती ती या तिथीला संत एकनाथ महाराजांनी पैठणच्या गोदावरीतीरी शुद्ध केली म्हणून या तिथीला ज्ञानेश्वरीची जयंती साजरी होते तसा ज्ञानेश्वरीत कोठेही माऊलींनी उल्लेख केला नसल्याचे त्यांनी सांगितले. पुढीलवर्षी भव्य दिव्य स्वरूपात ज्ञानेश्वरी जयंती साजरी करू जयंतीसाठी राजमान्यता मिळावी यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही बोलतांना दिली.

यावेळी हभप गहिनीनाथ महाराज आढाव,श्री संत सेवा संघाचे मार्गदर्शक व पुणे येथील उद्योजक उदयदादा चिरडे,संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर भक्त मंडळाचे सदस्य डॉ.करणसिंह घुले,कृषी तज्ञ एकनाथराव भगत,शिवाजी होन,माजी सरपंच सतीश गायके,अरुण रासने,चंद्रकांत सुरडे,भाजपचे शहराध्यक्ष मनोज पारखे,जालिंदर गवळी, मंगेश पडवळ, स्वप्नील फल्ले, दीपक राठोड,गोरक्षनाथ वाल्हेकर, सौ. सोनाली पडवळ, सौ. धनश्री शिंगण, सुनील खाटीक, आदेश टेकाळे, भिकाजी खोसे,भानुदास गटकळ,एकनाथ लष्करे उपस्थित होते. मंगेश पडवळ यांनी आभार मानले. माऊलींच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇