Type Here to Get Search Results !

शिक्रापुर पोलीस स्टेशनकडून गणेशोत्सवाच्या अनुषंगाने सराईत गुन्हेगारांवर केली हद्दपारीची कारवाई

 शिक्रापुर पोलीस स्टेशनकडून गणेशोत्सवाच्या अनुषंगाने सराईत गुन्हेगारांवर  केली हद्दपारीची कारवाई

 यामध्ये विशेष करुन पाबळ, वढु बुः,दहिवडी, तळेगाव ढमढेरे, घोलपवाडी,पेरणे गाव येथील लोंकाचा समवेश

 

प्रतिनिधी सुनिल पिंगळे पाबळ /शिक्रापूर - पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर पोलीस स्टेशन माध्यमातून गणेशोत्सवाच्या अनुषंगाने व कोरोना विषानु प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने वेगवेगळ्या उपाय योजना केल्या आहे. त्या कोणत्याही प्रकारे उल्लंघन होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये याकरीता शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील बेकायदा दारूविक्री करणारे व इतर सराईत गुन्हेगार यांचेवर शिकापुर पोलीस स्टेशन मार्फत खालील हद्दपार करण्यात आले आहे . १ ) शरद उर्फ अनुप हरिश्चंद्र गायकवाड (रा . वढु बु . ता . शिरूर जि . पुणे) २ ) अमोल कैलास सातकर (रा . दहिवडी ता.शिरूर जि . पुणे ) ३ ) विकास रामदास शिंदे (रा . कुंभारआळी तळेगाव ढमढेरे ता . शिरूर जि . पुणे ) ४ ) उत्तम अंबादास भुजबळ ( रा . तळेगाव ढमढेरे ता.शिरूर जि . पुणे) ५ ) अमोल भिमराव ढमढेरे (रा . तळेगाव ढमढेरे ता . शिरूर जि . पुणे) ६ ) नामदेव तान्हाजी मोरे ( रा . तळेगाव ढमढेरे ता.शिरूर जि . पुणे) ७ ) चंद्रशेखर दादाभाऊ घोलप (रा . घोलपवाडी ता . शिरूर जि . पुणे) ८ ) आनंद गणेश गायकवाड (रा . पाबळ ता . शिरूर जि . पुणे) ९ ) राहुल रामदास शिंदे (रा . तळेगाव ढमढेरे ता . शिरूर जि . पुणे) १० ) महादेव यशवंत बवले (रा . पेरणे गाव ता . हवेली जि.पुणे) याबाबत पोलीस निरीक्षक श्री हेमंत शेडगे शिक्रापूर पोलीस स्टेशन यांनी फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १ ९ ७३ मधिल कलम १४४ ( २ ) अन्वये सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी दिनांक ११ / ० ९ / २०२१ ते दिनांक २० / ० ९ / २०२१ या कालावधी पर्यंत वर नमुद केलेल्या लोकांना शिकापुर पोलीस स्टेशन हद्दीतुन हद्दपार करण्यात आले आहे.

          

सदरची कामगीरी ही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे तर गेले दहा दिवस चालु असलेले भक्तमय वातावरणातील गणेशोत्सव आजच्या विर्सजनच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत नियमांचे उल्लंघन होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून उपाययोजना केली गेली आहे तरी सर्व गणेश मंडळे व सर्व गणेशभक्तांना नियमाचे उल्लंघन करु नये असे आवाहन करण्यात आले आहे

Tags