Type Here to Get Search Results !

नेवासा शहरातील संतप्त नागरिकांच्या वतीने मुख्याधिकारी व नगराध्यक्षांच्या खुर्चीला हार घालून निषेध आंदोलन.| C24Taas|

 नेवासा शहरातील संतप्त नागरिकांच्या वतीने मुख्याधिकारी व नगराध्यक्षांच्या खुर्चीला हार घालून निषेध आंदोलन.| C24Taas|


Telegram👇ग्रुप जॉईन करा..

https://t.me/joinchat/S3zVPTU7uWIqFhgG


नेवासा - नगरपंचायत मध्ये भाजपा नगरसेवक असलेल्या प्रभागात विकासकामे करताना होत असलेला भेदभाव आणि विविध नागरी समस्यांकडे होत असलेले नगरपंचायतचे दुर्लक्ष यामुळे संतप्त झालेल्या महिला व नागरिकांनी भाजपा शहराध्यक्ष मनोज पारखे आणि गटनेते सचिन नागपुरे यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायतवर थाळी वाजवत मोर्चा काढुन नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या खुर्चीला हार घातला यावेळी प्रभाग क्रमांक 5 व 7 मधील महिला व नागरिक उपस्थित होते.

यावेळी बोलताना मनोज पारखे म्हणाले की नगरपंचायत जाणिवपूर्वक भाजपा नगरसेवक असलेल्या प्रभागात विकासकामे करताना भेदभाव करत आहे नागरिकांना 5,6 दिवसांतुन एकदा पाणी पुरवठा करण्यात येतो, कचरा व्यवस्थापन वेळोवेळी होत नाही, पावसामुळे नागरिकांना रस्त्यावर चालणेही मुश्किल झाले आहे या समस्या मांडण्यासाठी नगरपंचायतीचे अधिकारी व पदाधिकारी अनुपस्थित असतील तर या नागरिकांनी जायचे कुठे? असा संतप्त सवाल उपस्थित केला.

नेवासा तालुक्यातील बातम्यासाठी C24 तास WhatsApp group:

गटनेते सचिन नागपुरे म्हणाले की पावसाळ्याच्या तोंडावर मी अनेक दिवसांपासुन प्रभागात मुरुम टाकावा यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करत होतो परंतु नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी कुठलाही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही इतर प्रभागात विकासकामांसाठी निधी मंजूर होतो परंतु जाणिवपूर्वक आमच्या प्रभागात गेल्या दोन वर्षांपासून एकही रुपया मंजूर करण्यात आला नाही. यावेळी उपस्थित महिलांनीही आपल्या समस्या मांडताना म्हणाल्या की आमच्या घराकडील रस्त्याची दुरवस्था बघायला यावे यासाठी आम्ही आज इथे आलो आहोत परंतु इथे कुणीही उपस्थित नसल्याने आम्ही त्यांच्या खुर्चीला हार घालून निषेध व्यक्त करत आहोत.


यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी, भाजयुमो शहराध्यक्ष प्रतिक शेजुळ, अंकुश काळे, निरंजन डहाळे, विवेक नन्नवरे, कृष्णा डहाळे, आकाश देशमुख, आदिनाथ पटारे, रमेश घोरपडे, जनार्दन जाधव, बाळासाहेब क्षिरसागर, आप्पासाहेब गायकवाड, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇