Type Here to Get Search Results !

नेवासा - कुकाण्यात बिंगो जुगारावर छापा. | C24Taas|

नेवासा - कुकाण्यातील बिंगो जुगार खेळावर गुन्हे शाखेचा छापा;१३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल .| C24Taas|


( शंकर नाबदे ) नेवासा तालुक्यातील कुकाणा येथे  सुरू असलेल्या बिंगो जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून हा बिंगो जुगार खेळणाऱ्या १३ जणांविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
     याबाबत  स्थानिक गुन्हे शाखेचे पो.ना ज्ञानेश्वर नामदेव शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, दि.१ सप्टेंबर रोजी नेवासा पोलिस ठाणे हृददीमध्ये अवैध धंदयावर कारवाई करत असतांना पोहेकॉ विजयकुमार वेठेकर यांना गुप्त बातमी दारामार्फत बातमी मिळाली की, कुकाणा गावामध्ये हॉटेल पारखच्या आडोश्याला नितिन शिवाजी धोत्रे हा त्याचे हस्तकामार्फत बिंगो नावाचा जुगार कॅम्युटरवर डाउनलोड करुन लोकांना जमवुन खेळ खेळत आहेत. 

Telegram👇ग्रुप जॉईन करा..

https://t.me/joinchat/S3zVPTU7uWIqFhgG


त्यावेळी नेवासा पोलीस ठाण्याचे ज्ञानेश्वर देवकाते व यांना मदती कामी सोबत घेवुन सदर ठिकाणी गेलो असता १२ ते १३ जण हे कॅम्युटरवर बिंगो नावाचाजुगार खेळतांना दिसले.त्यावेळी तेथे छापा टाकला व सदर जुगार खेळत असलेले भागवत गिनदेव वनवे (वय २१ रा. आखारबाग पाथर्डी,लक्ष्मण बबन मासाळकर (वय २० रा. नाथनगर, पाथर्डी,सचिन रामु साळवे (वय-२० रा.तेलकुडगाव ता. नेवासा),संजय कुंडलिक घाडगे (वय-३२ रा. तेलकुडगाव ता. नेवासा), गणेश मोहन वाबळे (वय २६ रा. अंतरवली ता. नेवासा),नामदेव रामभाउ सरोदे (वय ३१ रा.अंतरवली ता. नेवासा), स्वप्निल सुभाष गोर्डे (वय ३६ रा.कुकाण ता. नेवासा ), विलास एकनाथ आहेर (वय ३१ रा.दहेगावने ता.शेवगाव),संकेत विजु गर्जे (वय १९ रा. वडुले ता. नेवासा), अशोक विठठल चावरे (वय ३० रा. दहेगाव ने ता. शेवगाव),संदिप हरीभाऊ काळे (वय ४० रा. तेलकुडगाव ता. नेवासा), अंकुश उत्तम घुटे (वय २७ रा. कुकाणा ता. नेवासा) व मालक नितिन शिवाजी धोत्रे (रा. विजयनगर,पाथर्डी) असे पकडलेल्या इसमांचे नावे आहेत.
      पकडलेल्या तेरा जणांकडून मोबाईल,रोख रक्कम असा ८७ हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.वरील १३ जणांविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात 
मुंबई जुगार कायदा कलम १२(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेवासा तालुक्यातील बातम्यासाठी C24 तास WhatsApp group:



❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇