Type Here to Get Search Results !

नेवासा - चांदा येथून कत्तलखान्यात जनावरे नेत असताना सोनई पोलिसांचा छापा,२७ गाई,वासरे व दोन टॅम्पो जप्त तिघास अटक, दोन फरार.| C24Taas|

  नेवासा - चांदा येथून कत्तलखान्यात जनावरे नेत असताना सोनई पोलिसांचा छापा,२७ गाई,वासरे व दोन टॅम्पो जप्त तिघास अटक, दोन फरार.| C24Taas|


( शंकर नाबदे ) नेवासा तालुक्यातील चांदा येथील कुरेशी गल्लीत सोनई पोलिसांनी छापा टाकून अवैद्य पध्दतीने जनावरांची तस्करी व खरेदी करुन औरंगाबाद येथील कत्तलखान्यात नेत असलेल्या २७ गाय,बैल व वासरांची सुटका केली. या कारवाईत १८ लाख ८३ हजाराचा ऐवज जप्त करण्यात येवून तीन जणास अटक करण्यात आली तर दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले आहे. 
     याबाबत मिळालेल्या गोपनीय माहिती नंतर सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे,सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात व पथकाने काल मंगळवारी सायंकाळी छापा टाकून ७ लाख ८३ हजार रुपये किंमतीचे २७ जनावरे ताब्यात घेतली.याशिवाय विनापरवाना वाहतुकीसाठी आणलेले ११ लाख रुपये किंमतीचे दोन टॅम्पो एम.एच.१६.सी.सी.८५९४ व एम.एच.१७.बी.डी.११२ दोन पंचाच्या उपस्थितीत जप्त करण्यात आली आहे. 

Telegram👇ग्रुप जॉईन करा..

https://t.me/joinchat/S3zVPTU7uWIqFhgG


पोलिस कर्मचारी ज्ञानेश्वर वाघ यांच्या फिर्यादीवरुन अजहर ताहीर शेख (वय २९ रा.कुरेशी मोहल्ला, चांदा ता नेवासा,)
जुनेद अब्बास शेख (वय२१ वर्षे रा. सुमित्रा कॉलणी, निराला बाजार,औरंगाबाद),भगवान विष्णू धुमाळ,(वय ४७ रा.लोहारवाडी रस्ता,चांदा) या तिघास अटक करण्यात आली आहे. 
      इशद कदिर शेख व शनि पठाण दोघे रा. चांदा ता. नेवासा फरार झाले आहेत.
     येथील कारवाईत लहानमोठी वेगवेगळ्या रंगाची गोवंश जातीची जनावरे अवैधरित्या कत्तल करुन मांस विक्री करण्याचे उद्देशाने सदरची जनावरे कब्जात बाळगुन वरील सर्व जनावरे यांना असुरक्षीतपणे हालचाल करता येणार नाही अशा रितीने अखुड दोरखंडाने आयशर टेम्पो व पिकअप गाडी मध्ये बांधुन सदर जनावरांना पुरेसा अन्न पाणी निवारा यांची सोय केलेली नव्हती. त्यांची देखभाल न करता क्रुरतेने जनावरे बांधलेल्या स्थीतीत आढळून असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.या छापा पथकात पोलिस कर्मचारी बाबा वाघमोडे, विठ्ठल थोरात,दत्तात्रेय गावडे,मुत्यूंजय मोरे,व नानासाहेब तुपे यांचा सहभाग होता. हवालदार अडकित्ते अधिक तपास करत आहेत. 

नेवासा तालुक्यातील बातम्यासाठी C24 तास WhatsApp group:



❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇