नेवासा : ज्ञानोबा माऊली... तुकाराम...चा जयघोष करत नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराजांचे मंदिर दर्शनासाठी खुले भक्तीच्या श्रद्धेचे बळ कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी फलदायी ठरेल - शिवाजी महाराज देशमुख| C24Taas|

Telegram👇ग्रुप जॉईन करा..
https://t.me/joinchat/S3zVPTU7uWIqFhgG
नेवासा ( शंकर नाबदे ) : ज्ञानोबा...माऊली... तुकाराम. "पुंडलिक वरदा... हरि विठ्ठल"चा जयघोष करत नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराजांचे मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले.मंदिराचे प्रमुख हभप गुरुवर्य शिवाजी महाराज यांच्या हस्ते मंदिराचे कुलूप उघडण्यात आले.भक्तीची शक्ती श्रद्धेचे बळ कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी फलदायी ठरेल असे प्रतिपादन शिवाजी महाराज देशमुख यांनी यावेळी बोलतांना केले.
गेल्या दीड ते दोन वर्षांपासून शासन आदेशानुसार सर्व मंदिरे बंद होती आता ती उघडली असली तरी सुरक्षेसाठी सामाजिक अंतराचे पालन येथे केले जात असून दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली असून मंदिर खुले झाले असले तरी माऊलींच्या "पैस" खांबापासून पंधरा ते वीस फूट अंतरावर पादुका ठेवण्यात येऊन दर्शनाकरीता सामाजिक अंतराचे पालन करण्याचा निर्णय संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर संस्थानच्या वतीने घेण्यात आला असल्याचे शिवाजी महाराज देशमुख यांनी यावेळी बोलताना सांगितले.
मंदिर खुले झाल्यामुळे मंदिर परिसरात व दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये उत्साह दिसून येत होता
नेवासा तालुक्यातील बातम्यासाठी C24 तास WhatsApp group:
❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇