नेवासा : नगर - औरंगाबाद महामार्गावर वाहन चालकांना लुटणारी टोळी जेरबंद| C24Taas|
Telegram👇ग्रुप जॉईन करा..
https://t.me/joinchat/S3zVPTU7uWIqFhgG
नेवासा ( शंकर नाबदे ) : नेवासा पोलिसांनी रात्रीच्या वेळी महामार्गावरील वाहनचालकांना लुटणारी टोळी नेवासा पोलिसांनी जेरबंद केली.
याबाबत माहिती अशी की,१५ जुलै २०२१ रोजी अमरावती येथील डॉ.सतीश विधळे (रा. अमरावती) हे परिवारासह पुण्याकडे जात असताना त्यांची कार नगर-औरंगाबाद महामार्गावर प्रवरासंगम जवळ पंक्चर झाली. ते रस्त्याच्या कडेला गाडीचे चाक बदलत असताना मोटार सायकलवरून आलेल्या दोघांनी चाकूचा धाक दाखवत जीवे ठार मारण्याची धमकी देऊन बळजबरीने त्यांच्याकडील दहा हजार रुपये रोख रक्कम,तीन मोबाईल व सोन्याचे दागिने घेऊन पलायन केले होते.

