Type Here to Get Search Results !

नेवासा - स्त्री शक्तीचा गजर, मराठमोळा पेहरावने झेंडा मिरवणूक. | C24TAAS |

नेवासा - स्त्री शक्तीचा गजर आदिमाया आदी शक्ती ग्रुपच्या वतीने झेंडा मिरवणूक. | C24TAAS |

Telegram👇ग्रुप जॉईन करा..

https://t.me/joinchat/S3zVPTU7uWIqFhgG

नेवासा नगरीचे ग्रामदैवत श्री मोहिनीराजांच्या यात्रेनिमित्त रविवार २० फेब्रुवारी रोजी स्त्री शक्तीचा गजर पहावयास मिळाला,श्री मोहिनीराज महाराज की जय असा जयघोष करत नेवासा येथील “आदिमाया आदी शक्ती” महिला ग्रुपच्या वतीने काढण्यात आलेली झेंडा मिरवणूक सर्वांचे आकर्षण ठरली.
नेवासा येथील श्री दुर्गादेवी मंदिरापासून दुपारी ४ वाजता सुरुवात झाली आई जगदंबेचा उदो उदो, श्री मोहिनीराज महाराज की जय असा जयघोष करत मिरवणुकीला प्रारंभ झाला. सदर मिरवणुकीत “आदी माया आदी शक्ती” ग्रुपच्या महिला सदस्यांनी खनाची साडीसह भगवा फेटा, नाकात नथ असा मराठमोळा पेहराव केला होता.
सदरची मिरणुक ढोल ताशांच्या गजरात मुख्य पेठेतून मारुती चौकात गेली तेथे गोल रिंगण करून आदिमाया आदीशक्तीच्या महिलांनी फेर धरत फुगडी खेळली. झेंडा मिरवणुकीचे हे तिसरे वर्ष असून या झेंडा मिरवणूकीचे
सुवासींनींनी पंचारती ओवाळून स्वागत केले. सदरची मिरवणूक श्री मोहिनीराजांच्या मंदिर प्रांगणात गेल्या नंतर झेंड्याची पूजा करून तो मंदिरावर चढविण्यात आला.

नेवासा तालुक्यातील बातम्यासाठी C24 तास WhatsApp group:


❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇