Type Here to Get Search Results !

नेवासा - माझी वसुंधरा अभियान अंतर्गत नगरपंचायतच्या वतीने काढलेल्या सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद | C24TAAS |

 नेवासा - माझी वसुंधरा अभियान अंतर्गत नगरपंचायतच्या वतीने काढलेल्या सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद | C24TAAS |

Telegram👇ग्रुप जॉईन करा..

https://t.me/joinchat/S3zVPTU7uWIqFhgG

 "माझी वसुंधरा अभियान" अंतर्गत संत गाडगेबाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधून नेवासा नगरपंचायत ते श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय या अंतराच्या सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नेवासा नगरपंचायतचे नगराध्यक्ष सौ.योगिता सतीश पिंपळे, उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव जगताप, मुख्याधिकारी अंबादास गर्कळ,कार्यालयीन अधीक्षक रविंद्रकुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या सायकल रॅलीचे आयोजन नगरपंचायत व ज्ञानेश्वर विद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
नेवासा नगरपंचायत चौकापासून सायकल रॅलीचा शुभारंभ झेंडा फडकावून तहसीलदार रुपेश सुराणा यांच्या हस्ते करण्यात आला.या रॅलीचा समारोप श्री ज्ञानेश्वर कॉलेज येथे करण्यात आला.यावेळी झालेल्या समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपनगराध्यक्ष लक्ष्मण जगताप हे होते.तर प्राचार्य डॉ.गोरक्षनाथ कल्हापुरे, उपप्राचार्य आयनर सर, मुख्याधिकारी अंबादास गर्कळ, नगरसेवक सचिन नागपुरे,नगरसेवक दिनेश व्यवहारे, कार्यालयीन अधीक्षक रविंद्रकुमार गुप्ता व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी नगराध्यक्ष सतीश पिंपळे,ओम साई ग्रुपचे सदस्य सायकलपटू गणेश माटे, प्रशांत बडाख,प्रेस क्लबचे अध्यक्ष पत्रकार सुधीर चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करून सायकल रॅलीचा उपक्रमाचे कौतुक केले.

यावेळी बोलतांना नगरपंचायतचे मुख्याधिकारी अंबादास गर्कळ म्हणाले की पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वृक्षारोपण तर आरोग्याच्या जपवणुकीसह प्रदूषण रोखण्यासाठी इंधन विरहित असलेल्या सायकलचा वापर दैनंदिन जीवनात करणे गरजेचे असल्याचे सांगून वाढते प्रदूषण रोखण्यासाठी वसुंधरेची जपवणूक करूया असे आवाहन केले.

नेवासा तालुक्यातील बातम्यासाठी C24 तास WhatsApp group:

यावेळी बोलतांना ज्ञानेश्वर कॉलेजचे प्राचार्य डॉ.गोरक्षनाथ कल्हापुरे म्हणाले की इंधन विरहित वाहनांसाठी व प्रदूषण रोखण्यासाठी जनजागृतीद्वारे काढलेली सायकल रॅली उपक्रम कौतुकास्पद असून पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वृक्षारोपण सारखी चळवळ उभी करू या व माऊलींच्या भूमीतील संदेश जगाला सांगू या,प्रदूषण रोखण्यासाठी इंधन विरहित सायकलचा वापर करूया असे आवाहन यावेळी बोलतांना केले.
यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी नगरपंचायतचे कर निरीक्षक रामदास म्हस्के,स्थापत्य अभियंता प्रविण कदम, लेखापाल भाऊसाहेब म्हसे,राहुल आढाव,सागर गाडे यांच्यासह नगरपंचायतचे कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजना तसेच राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रा.निपुंगे यांनी सूत्रसंचालन केले.तर नगरपंचायतचे कार्यालयीन अधीक्षक रविंद्रकुमार गुप्ता यांनी आभार मानले.

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇