नेवासा - मुकुंदराव आघाव यांची DYSP पदी नियुक्ती झाल्याबद्दल घुले पाटील पतसंस्थेच्या वतीने सन्मान. | C24TAAS |
Telegram👇ग्रुप जॉईन करा..
https://t.me/joinchat/S3zVPTU7uWIqFhgG
नेवासा पोलीस स्टेशनला धडाकेबाज कामगिरी केलेले तत्कालीन पोलीस निरीक्षक मुकुंदराव आघाव यांची औरंगाबाद ग्रामीण अंतर्गत कन्नड विभागाचे पोलीस उपअधीक्षकपदी नियुक्ती झाल्याबद्दल नेवासा येथील लोकनेते स्व.मारुतराव घुले पाटील पतसंस्थेच्या वतीने गौरव करण्यात आला.
नेवासा येथील लोकनेते स्व.मारुतराव घुले पाटील पतसंस्थेच्या सभागृहात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदकुमार पाटील हे होते तरपोलीस उपअधीक्षक मुकुंदराव आघाव,व्यापारी विनायक नळकांडे,अभय गुगळे,नामदार शंकरराव गडाख यांचे स्वीय सहायक जयदीप जामदार,यात्रा कमिटीचे सदस्य जालिंदर गवळी,दीपक धोत्रे,आकाश एरंडे,आम्ही नेवासकर ग्रुपचे पत्रकार सौरभ मुनोत यावेळी उपस्थित होते.
प्रारंभी नेवासा प्रेस क्लबचे अध्यक्ष पत्रकार सुधीर चव्हाण यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले.यावेळी लोकनेते स्व.मारुतराव घुले पाटील पतसंस्थेसह,यात्रा कमिटी, नेवासा प्रेस क्लब,आम्ही नेवासकर ग्रुपच्या वतीने पोलीस उपअधीक्षक म्हणून पदोन्नती मिळाल्याबद्दल मुकुंदराव आघाव यांचा सत्काराद्वारे गौरव करण्यात आला.
नेवासा तालुक्यातील बातम्यासाठी C24 तास WhatsApp group:
यावेळी बोलतांना मारुतराव घुले पाटील पतसंस्थेचे चेअरमन नंदकुमार पाटील म्हणाले की नेवासा पोलीस स्टेशन अंतर्गत जातीय सलोखा वृद्धिंगत करण्याचे काम मुकुंदराव आघाव यांनी आपल्या कारकिर्दीत केले. माऊलींच्या भूमीतील त्यांनी दिलेली सेवा सर्व नेवासकरांच्या मनात असून ती कधीही विसरली जाणार नाही असे सांगून आघाव यांच्या भावी कार्याला त्यांनी शुभेच्छा दिल्या.
पोलीस उपअधीक्षक मुकुंदराव आघाव म्हणाले की देवगडसह माऊली व संतांच्या या भूमीत फार काही शिकायला मिळाले कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अनेकांचे सहकार्य मिळाले यातूनच मित्रांचा मोठा गोतावळा मला मिळाला नेवासकरांनी व मित्र परिवाराने दिलेले प्रेम व संतांचे मिळालेले आशीर्वाद मला काम करण्यासाठी नेहमी ऊर्जा देत राहील अशा भावना त्यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केल्या.
यावेळी विकी खराडकर,सचिन पडूंरे,विनायक शिंदे, अक्षय पंडूरे पतसंस्थेचे लक्ष्मणराव नाबदे उपस्थित होते.जालिंदर गवळी यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇
