नेवासा - चोरट्यांचा हल्ल्यात एक ठार; दोन जण जखमी.| C24TAAS |
Telegram👇ग्रुप जॉईन करा..
https://t.me/joinchat/S3zVPTU7uWIqFhgG
नेवासा तालुक्यातील चांदा येथील कर्डिले वस्तीवर १ मार्च मंगळवारी मध्यरात्री एक वाजेच्या दरम्यान बापूसाहेब कर्डिले यांच्या घरी चोरीसाठी गेलेल्या
चोरट्यांनी जबर मारहाण करत चाकूने सपासप वार केल्याने ओंकार कर्डिले, वय २२ वर्ष हा युवक ठार झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अशी माहिती पोलिसांकडून मिळाली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक मनोज पाटील, विभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
अहमदनगरच्या खासगी रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू असून मृत झालेला ओंकार कर्डिले यांचे शवविच्छेदन जिल्हा रुग्णालयात करण्यात येत आहे.
नेवासा तालुक्यातील बातम्यासाठी C24 तास WhatsApp group:
❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇
