Type Here to Get Search Results !

नेवासा पोलिसांनी मोटरसायकल चोरास पाठलाग करून पकडले.| C24TAAS |

नेवासा पोलिसांनी मोटरसायकल चोरास पाठलाग करून पकडले.| C24TAAS |

Telegram👇ग्रुप जॉईन करा..

https://t.me/joinchat/S3zVPTU7uWIqFhgG


नेवासा पोलिसांनी रात्रीच्या गस्ती दरम्यान नगर-औरंगाबाद महामार्गावर नेवासा फाटा जवळ पाठलाग करून विना नंबरच्या मोटारसायकल सह एका मोटारसायकल चोरास पकडले.

याबाबत पोलिसांकडून माहिती अशी की, रात्री च्या गस्त दरम्यान स.फौ. कैलास साळवे, पो.कॉ. कैवल राजपुत, चालक दिलीप कु-हाडे यांना नगर औरंगाबाद महामार्गावरील गाव शिवारातील नेवासा फाट्याजवळ रिलायन्स कंपनीच्या तिथे दोन इसम एका विना नंबरचे मोटारसायकल वरुन संशयीतपद रीत्या फिरत असल्याने त्यांना गाडी थांबण्यासाठी सांगितले असता ते पळून जाण्याचा प्रयत्न करु लागले.
वरील पोलीस पथकाने त्यांचा पाठलाग करुन एक जनास मोटार सायकलसह पकडले असता त्याच्या अंगझडतीमध्ये तीन मोबाईल मिळुन आले. पोलीस पथकाने त्याकडे अधिक तपास केला असता इसमाने त्याचे नाव ज्ञानेश्वर गणपत शडूते (वय 24 वर्षे) रा. घुलेवाडी ता. संगमनेर जि. अहमदनगर असे सांगितले.
त्याच्याकडे सापडलेली काळ्या रंगाची मोटारसायकल क्रमांक- MH17BQ8967 ही नेवासा पोलीस स्टेशन गुं.र.न 165/2022 भा.द.वी कलम 379 मधील चोरीस गेलेली मोटारसायकल आढळुन आली आहे. सदर मोटारसायकल चोराकडुन आणखी वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
       पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती स्वाती भोर, उपविभागिय पोलीस अधिक्षक सुदर्शन मुंडे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार, पो.हे.कॉ गिते, पो.हे. कॉ साळवे व पो.कॉ राजपुत यांनी ही कामगिरी केली आहे.

नेवासा तालुक्यातील बातम्यासाठी C24 तास WhatsApp group:

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇