Type Here to Get Search Results !

अकोले - अशोकराव भांगरे यांचं आज रात्री 10 वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अकाली दुःखद निधन

 अकोले तालुक्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि अगस्ती साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अशोकराव भांगरे यांचं आज रात्री 10 वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अकाली दुःखद निधन झालं. त्यांच्या अकाली जाण्यानं अकोले तालुक्यासह नगर जिल्ह्यातून हळहळ व्यक्त होत आहे.  अशोकराव भांगरे हे जिल्हा परिषद अहमदनगर चे माजी अध्यक्ष राहिले असुन, माजी आदिवासी विकास  मंञी मधुकरराव पिचड यांचे ते कट्टर विरोधक समजले जात होते.व आमदार यशवंतराव भांगरे यांचे चिरंजिव होते तसेच 

आदिवासींच्या हक्कांसाठी लढणारा लोकनेता अशी त्यांची अोळख होती









असा हरह्हुन्नरी नेता हरपल्याने सर्वत्र शोक व्यक्त केला जातोय.

अशोकराव भांगरे यांना उपचारासाठी घोटी येथील एस. एम. बी. टी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न अयशस्वी ठरल्याने अशोकराव भांगरे यांची प्राणज्योत मालवली.

अकोले तालुक्याच्या राजकारणात अशोकराव यांचा नेहमीच मोलाचा वाटा राहिलाय. आश्या ह्या लोकनेत्याला सी २४ तास वृत्तवाहीणी कडून भावपुर्ण श्रध्दांजली....