बुरुंजवाडीतील सरपंचांनी सोडवला ५० वर्षांचा स्मशानभूमीचा प्रश्न
बुरुंजवाडीत सरपंच रुके व डॉ. रवींद्र टेमगिरेंकडून २० गुंठे
जागा उपलब्ध
शिक्रापूर, (सुनिल डी.पिंगळे)- बुरुंजवाडी (ता. शिरुर) येथील ग्रामस्थांना ५० वर्षांपासून नागरिकांच्या अंत्यविधीसाठी आवश्यक असलेली स्मशानभूमी उपलब्ध नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. सरपंच नानासाहेब रुके मधुकर टेमगिरे, डॉ. रवींद्र टेमगिरे, विजय टेमगिरे या चौघांनी वीस गुंठे जमीन विकत घेत ग्रामपंचायतला स्मशानभूमीसाठी देऊ केल्याने गावातील प्रलंबित स्मशानभूमीचा प्रश्न आता निकालात निघणार आहे.अनेक वर्षे झाली आहेत. ग्रामपंचायत स्थापनेच्या पूर्वीपासून स्मशानभूमी बांधण्यासाठी जागाच उपलब्ध नव्हती. स्मशानभूमीसाठी जागा दान करण्याचा शब्द सरपंच नानासाहेब रुके व डॉ. रवींद्र टेमगिरे यांनी दिला होता. नुकतेच सरपंच रुके, किसान संघाचे अध्यक्ष मधुकर टेमगिरे, डॉ. रवींद्र टेमगिरे, विजय टेमगिरे, चेअरमन विजय टेमगिरे यांनी २० गुंठे जागा विकत घेऊन ग्रामपंचायतीला बक्षीसपत्र
देऊ केली आहे. सरपंच रुके यांनी जनसेवा योजनेच्या माध्यमातून नवीन स्मशानभूमी बांधकामसाठी दहा लाख निधी मंजूर करुन घेतल्याने लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. असे संरपच रुके, उपसरपंच अश्विनी नळकांडे, चेअरमन टेमगिरे, माजी सरपंच विलास नळकांडे, सुशिलकुमार रुके, धनंजय रुके, शरद टेमगिरे, ग्रामपंचायत सदस्या कावेरी नळकांडे, पूनम रुके यांनी सांगितले
तर अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले स्मशानभूमीसाठी अनेक वेळा निधी उपलब्ध होऊनही केवळ जागांची उपलब्ध नसल्याने तो मागे जात होता यांची खंत सरपंच रुके, किसान संघाचे अध्यक्ष मधुकर टेमगिरे, डॉ. रवींद्र टेमगिरे, विजय टेमगिरे, चेअरमन विजय टेमगिरे यांना होती म्हणून जमीन खरेदी करत त्यांनी घेतलेले एकत्रित येऊन निर्णय कौतुकास्पद आहे यामुळे बुंरजवाडी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं दानशूर व्यक्तीचं ॠण व्यक्त केले आहे आणि सर्व स्तरातून त्यांच कौतुक होतं आहे
