Type Here to Get Search Results !

घोडेगाव - विद्या विकास मंडळ संचलित न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष खरेदीचा आनंद

 विद्यार्थ्यांनी घेतला प्रत्यक्ष खरेदीचा आनंद 









आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचलित न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या  इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष खरेदीचा आनंद घेतला. विद्यार्थ्यांनी प्रथम पंचायत समिती आंबेगाव या कार्यालयास भेट दिली. पंचायत समिती मध्ये कोणकोणती कामे केली जातात याविषयी शिक्षकांनी मार्गदर्शन केले. तसेच वैष्णवी बेकरी या ठिकाणी त्यांनी बिस्किट, केक इत्यादी पदार्थ कसे बनले जातात ही प्रत्यक्ष प्रक्रिया कशी होते याची पाहणी केली. विद्यार्थ्यांनी बिस्किट,केक व इतर बेकरी पदार्थ खरेदीचा आनंद घेतला तसेच विद्यार्थ्यांनी आठवडी बाजार या ठिकाणी विविध भाज्यांची खरेदी केली. विद्यार्थ्यांना संवाद कौशल्य, पैशाचे व्यवहारिक ज्ञान, प्रत्यक्ष खरेदी करतानाचा अनुभव, दैनंदिन जीवनात मालाची निवड, मालाची प्रत व वजन कसे पाहावे इत्यादी बाबीसाठी क्षेत्रभेटीचे आयोजन केले होते.

या क्षेत्रभेटीसाठी श्रीमती वंदना वायकर, श्रीमती प्रज्ञा घोडेकर, श्री नितीन गायकवाड यांनी मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष खरेदी संदर्भातील आढावा घेतला.

मार्गदर्शक शिक्षक यांचे आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष श्री सुरेश शेठ भिमाजी शेठ काळे, उपाध्यक्ष श्री तुकाराम नामदेवराव काळे, कार्याध्यक्ष एडवोकेट श्री संजय दत्तात्रय आर्वीकर, संस्थेचे सचिव श्री. विश्वास अरविंदराव काळे इतर पदाधिकारी व संचालक, विद्यालयाच्या प्राचार्या मेरी फ्लोरा डिसोझा, उपप्राचार्या रेखा आवारी,  पर्यवेक्षिका वंदना वायकर यांनी पुस्तकी ज्ञानासहित प्रत्यक्ष क्षेत्रभेट व प्रत्यक्ष खरेदी चा अनुभव विद्यार्थ्यांना यावा यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केले.