Type Here to Get Search Results !

शिक्रापूर - सरपंच परिषद शिरूर तालुका "अध्यक्षपदी" सौ.सोनाली बंटी ढोकले यांची निवड

 सरपंच परिषद शिरूर तालुका "अध्यक्षपदी" सौ.सोनाली बंटी ढोकले यांची निवड



 शिक्रापूर प्रतिनिधी (सुनिल पिंगळे)

 करंदी गावच्या सरपंच सौ.सोनाली बंटी ढोकले यांची पंचायत राज विकास मंच च्या आखिल भारतीय सरपंच परिषद महाराष्ट्र राज्याच्या शिरूर तालुका अध्यक्ष पदी निवड व उपाध्यक्ष पदी जातेगाव खुर्द च्या सरपंच सौ.नंदा गुलाब रणपिसे यांची निवड झाली आहे. 

पंचायत राज विकास मंचाच्या आखिल भारतीय सरपंच परिषदेची आळंदी देवाची (ता.खेड)  येथे बुधवारी दि.११ रोजी बैठक झाली. या बैठकीत परिषदेच्या शिरूर तालुका अध्यक्षपदी सर्वानुमते करंदी गावच्या विद्यमान सरपंच सौ.सोनाली बंटी ढोकले यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत मोरे व पुणे जिल्हा अध्यक्षा सौ.उज्वलाताई गोकुळे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सौ.उर्मिला वळसे, सौ.प्राची लिंभोरे आंबेगाव तालुका अध्यक्ष उत्तम टाव्हरे खेड तालुका अध्यक्ष विद्याताई मोहिते, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष बंटी पाटील ढोकले तसेच करंदी ग्रा.पं.चे सदस्य सौ.सुनिता ढोकले, सौ.रेखा खेडकर आदी गावचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्य उपस्थित होते.

निवडीनंतर अध्यक्ष सोनाली ढोकले म्हणाल्या सरपंच हा गावच्या विकासाचा केंद्रबिंदू असतो. परंतु विकासकामे मंजूर करण्यासाठी सरपंचांना अनेक अडचणी समस्यांचा सामना करावा लागतो. आखिल भारतीय सरपंच परिषद या संघटनेच्या माध्यमातून सरपंच, ग्रा.पं.सदस्यांच्या अडचणी आपण निश्चित सोडवणार आहोत.