शिर्डी साईबाबा दर्शनासाठी पारगाव शिंगवे चे श्री नंदकुमार मनोहर चव्हाण, श्री भरत प्रकाश ढोबळे हे दिनांक 11/01/2023 रोजी सायकल पदयात्रे निमित्त पारगाव वरून सकाळी सहा वाजता निघाले आळेफाटा या ठिकाणी सव्वा नऊ वाजता पोहोचले आळेफाटा खापरवाडी येथे सायकल यात्रेचे स्वागत व चहा पाणी नाश्ता भिकाजी शिरतर व चारुशीला शिरतर यांनी केले 10:30 पुन्हा प्रवासाला सुरुवात केली तसेच संगमनेर वडगाव पान या ठिकाणी सायंकाळी साडेसात वाजता पोहोचलो यावेळी श्री चंद्रकांत एकनाथ शिरोळे यांच्या निवासस्थानी त्यांचे मित्र श्री नंदकुमार थोरात, साईराज शिरोळे, सत्यम थोरात यांनी औक्षण करून पुष्पगुच्छ देऊन सायकल यात्रेचे वडगाव पान या ठिकाणी निवासाची सोय करून दुसऱ्या दिवशी दिनांक 12/01/2023 रोजी आठ वाजता प्रवासाला सुरुवात केली दुपारी बारा वाजता शिर्डी साईबाबा ठिकाणी पोचलो शिर्डी नगरपालिका माजी स्टोर कीपर अण्णासाहेब खरात साहेब यांनी शिर्डी या ठिकाणी सायकल पदयात्रेचे साई वस्त्र व गुलाब पुष्प देऊन सत्कार व स्वागत केले
तसेच हॉटेल साईकृपा शिर्डी या ठिकाणी पारगाव शिंगवे चे युवक कार्यकर्ते श्री दीपक साबळे, निलेश खुडे, संतोष हांडे, बाळासाहेब गाडेकर, गणेश दातखिळे यांनी रात्री दहा वाजता हॉटेल साईकृपा या ठिकाणी येऊन सायकल पदयात्रेचे स्वागत करून पारगाव ते शिर्डी सायकल पदयात्रा साठी खूप खूप शुभेच्छा दिल्या











