राजमाता जिजाऊंच्या जयघोषाने व स्वामी विवेकानंदांच्या तत्त्वज्ञानाने केंदूरनगरी प्रेरित.... सरपंच सूर्यकांत थिटे
शिक्रापूर प्रतिनिधी (सुनिल पिंगळे)
राजमाता जिजाऊंच्या जयघोषाने व स्वामी विवेकानंदांच्या तत्त्वज्ञाने केंदूर नगरी प्रेरित झाली असल्याची माहिती केंदूर नगरीचे प्रथम नागरिक सरपंच सूर्यकांत थिटे यांनी दिली राजमाता जिजाऊ च्या जयंतीच्या निमित्ताने व १२ जानेवारी ते १९ जानेवारी स्वामी विवेकानंदांच्या युवा सप्ताहाच्या निमित्ताने केंदूर मध्ये सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून उत्साहात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी केली. शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हास्तरावर गुणवत्ता यादीत आलेल्या पाच व राज्यस्तरावर गुणवत्ता यादीत आलेल्या एका विद्यार्थ्यांची भव्य मिरवणूक ट्रॅक्टर मधून ग्रामस्थांनी काढली यावेळी प्रभात फेरीचे मुख्य आकर्षण ठरले ते ढोल पथकाचे. विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांच्या ढोल पथकाने संपूर्ण केंदूरकरांचे लक्ष वेधून घेतले कार्यक्रमाला पंचायत समितीच्या उपसभापती सविताताई प-हाड, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे विभागीय सदस्य रामशेठ साकोरे,माजी सरपंच तुकाराम थिटे, पांडुरंग ताथवडे, युवा नेते शाहूराजे थिटे,मा.उपसरपंच भाऊसाहेब थिटे, मदन प-हाड, ग्राहक पंचायतीचे सतीश साकोरे, उद्योजक सतीश थिटे, बाबुराव थिटे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय केंदूरचे प्राचार्य अनिल साकोरे म्हणाले की विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व व सर्वांगीण विकासासाठी विद्यालयात अनेक अभिनव उपक्रम ग्रामस्थांच्या सहकार्याने राबवणार असून शैक्षणिक गुणवत्ता वाढीवर भर देणार आहे.
