Type Here to Get Search Results !

राहुरी - तालुक्यातील शिलेगाव येथे योगीराज सद्गुरु श्री गंगागिरी महाराज यांचा ४१ वा अखंड हरिनाम सप्ताहास मंगळवार दि. १७ जानेवारी पासून प्रारंभ ..


 



अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन.


कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे गावकऱ्यांनी केले.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


राहुरी तालुक्यातील शिलेगाव येथे योगीराज सद्गुरु श्री गंगागिरी महाराज यांचा ४१ वा अखंड हरिनाम सप्ताहास मंगळवार दि. १७ जानेवारी पासून प्रारंभ होत आहे.


या सप्ताह कार्यकाळात दैनंदिन कार्यक्रम पहाटे ४ वाजता काकड आरती, सकाळी पारायण वाचन तर सायंकाळी ६ वाजता हरिपाठ व सायंकाळी ७ ते ९ दररोज हरी कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. मंगळवार १७ जानेवारी रोजी ह. भ. प. अरुण महाराज पवार (आळंदी देवाची), ह. भ. प. महंत रामगिरी महाराज (येळी ता. पाथर्डी), ह. भ. प. माऊली महाराज कोठुळे (आळंदी देवाची), 


शुक्रवार दिनांक २० जानेवारी रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत ह. भ. प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन होणार आहे. ह भ प प्रकाश महाराज साठे (परभणी) ह भ प लक्ष्मण महाराज कदम शास्त्री (आळंदी देवाची), ह भ प केशव महाराज उखळीकर बीड यांचे जाहीर हरिकीर्तन होणार आहे. त्या निमित्ताने सप्ताह कार्यकाळात दैनंदिन सकाळी व सायंकाळी अन्नदानाची पंगत देण्यात येणार आहे.


मंगळवार दि. २४ जानेवारी रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज सरला बेट यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे. तरी या सप्ताहाचा व महाप्रसादाचा परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज सप्ताह कमिटी यांनी केले आहे.