चार जणांकडून सासरा व सुनेला लाथा बूक्क्यांनी व काठीने मारहाण.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
सामाईक बांधावरील पोल का उपटत आहेत, असे विचारल्याचा राग आल्याने चार जणांनी मिळून सासरा व सुनाला लाथा बूक्क्यांनी व लाकडी काठीने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. दिनांक ११ जानेवारी रोजी राहुरी तालूक्यातील तिळापूर शिवारात ही घटना घडलीय.
ताराबाई रामकृष्ण सरोदे, वय ३० वर्षे, रा. तिळापुर, ता. राहुरी. या महिलेचे तिळापुर गावाचे शिवारात शेत गट नंबर १९७ मध्ये शेत जमीन आहे. त्यांचे शेत जमीनीच्या शेजारी बाबासाहेब हरिभाउ बाचकर याची शेत जमीन आहे. सरोदे व बाचकर यांच्यात सामाईक बांदावरुन वाद आहेत.
दि. ११ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास ताराबाई सरोदे ह्या त्यांच्या तिळापुर गावच्या शिवारातील शेतातील गव्हाच्या पिकास पाणी धरत होत्या. त्यावेळी आरोपी तेथे आले. त्यांनी त्यांच्या शेतातील गवत सरोदे यांच्या शेतात टाकुन सामाईक बांदावरील सिमेंटचे पोल उपटु लागले. तेव्हा ताराबाई सरोदे त्यांना म्हणाल्या कि, सामाईक बांदावरील सिमेंटचे पोल का उपटतात.
असे म्हणालेचा त्यांना राग आल्याने आरोपींनी ताराबाई यांचे केस धरुन लाथाबुक्यांनी मारहाण करु लागले. तेव्हा ताराबाई यांचे सासरे विश्वनाथ सरोदे हे भांडणाची सोडवा सोडव करण्यासाठी आले असता त्यांना देखील आरोपींनी शिवीगाळ करुन लाकडी काठीने मारहाण करून जखमी केले.
तसेच तुम्ही जर आमचे नादी लागले तर तुम्हाला जिवे ठार मारुन टाकु, अशी धमकी दिली. या घटनेत ताराबाई यांच्या गळयातील डोरलं गहाळ झाले आहे. घटनेनंतर ताराबाई रामकृष्ण सरोदे यांनी राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली.
त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी १) बाबासाहेब हरिभाउ बाचकर, २) योगेश बाबासाहेब बाचकर, ३) चिमाजी बाबासाहेब बाचकर, ४) लताबाई बाबासाहेब बाचकर, सर्व रा. तिळापुर, ता. राहुरी यांच्या विरोधात गुन्हा रजि. नं. ३७/२०२३ भादंवि कलम ३२३, ३२४, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक मेघशाम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
