Type Here to Get Search Results !

राहुरी - कोंढवड येथील शिव प्रतिष्ठान संचलित शिवांकुर विद्यालयाचे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व स्नेहसंमेलन

 राहुरी तालुक्यातील कोंढवड येथील शिव प्रतिष्ठान संचलित शिवांकुर विद्यालयाचे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे शिक्षण विभागाचे मा.प्रशासन अधिकारी लक्ष्मणराव गुळवे हे होते तर प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्याचे मा.शिक्षण संचालक दिगंबरराव देशमुख यांची उपस्थिती होती.









यावेळी संस्थेच्या वतीने सचिव डॉ. प्रकाश पवार व संस्थापक अध्यक्ष रावसाहेब पवार, विश्‍वस्त उत्तमराव पवार त्यांच्या हस्ते मान्यवरांचा शाल- पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी आयोजित तसेच राहुरी तालुक्यातील विविध स्पर्धांमध्ये आणि विद्यालयात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकवणार्‍या शिवांकुर विद्यालयातील विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ‘शिवपुष्प’ या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. शिवपुष्प या अंकामध्ये विद्यार्थ्यांनी संग्रहित केलेल्या मराठी, इंग्रजी व हिंदी भाषेमधील कविता, गोष्टी, विनोद, सामान्य ज्ञान तसेच ऐतिहासिक गोष्टींच्या माहिती संकलन स्वरूपात तसेच शाळेने व संस्थेने वर्षभरामध्ये केलेल्या विविध सामाजिक, वैद्यकीय आणि शैक्षणिक उपक्रमांचा आढावा प्रकाशित करण्यात आला. यावेळी शिवांकुर विद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी गोरक्षनाथ औटी, उपाध्यक्ष गणेश शेळके, खजिनदार डॉ. किशोर पवार, विश्‍वस्त डॉ नरेंद्र इंगळे, विश्‍वस्त युवराज पवार, शिवसेनेचे तालुकाउपप्रमुख सचीन म्हसे, राष्ट्रवादीचे युवकचे जिल्हा उपाध्यक्ष विजय कातोरे, देसवंडीच्या मा.उपसरपंच मंगलताई पवार, इंद्रायणी पवार, शिवाजी टेमकर, डॉक्टर प्रतिक चौहान पत्रकार राजेंद्र परदेशी, पत्रकार कृष्णा गायकवाड, पत्रकार बंडू म्हसे, पत्रकार मंडलिक यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी अध्यक्षीय भाषणामध्ये लक्ष्मणराव गुळवे म्हणाले,   विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये विद्यार्थ्यांवर संस्कार करणारे पालक आणि शिक्षक यांचा महत्त्वाचा वाटा आहे. मी महाराष्ट्रात आत्तापर्यंत सर्व ठिकाणी फिरलो. परंतु, अशी शिस्त  मला बघायला फक्त इथेच मिळाली. यावेळी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक दिगंबरराव देशमुख यांनी त्यांच्या मार्गदर्शन पर भाषणामध्ये शाळेचे कौतुक केले व इथून पुढे या विद्यालयाला कुठलीही अडचण येणार नाही कारण संस्थेला मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही सदैव संस्थेसोबत आहोत असे त्यांनी आवर्जून सांगितले. विद्यालयाच्या कार्याचे कौतुक करून आज विद्यार्थ्यांना त्यांच्या कलेनुसार शिक्षणाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. पारितोषिक वितरणानंतर विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम हा यावेळी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. यामध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सामूहिक नृत्य, एकांकिका, पोवाडे व नाटक यांचे सादरीकरण केले या कार्यक्रमास पालकांनी देखील तेवढाच उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका छाया जाधव, किरण तारडे, सचीन जाधव, दादासाहेब झावरे, भाऊसाहेब करपे, गणेश बर्डे, अरूण खिलारी, मयुर धुमाळ, प्रियंका पांढरे, सुवर्णा थोरात, सविता गव्हाणे, शितल फाटक, सुजाता तारडे, रोहिणी भाकरे, प्रिया लांबे, अनिता लांबे, शारदा कोकाटे, तनुजा झुगे,पल्लवी भालदंड,श्रद्धा हरिचंद्रे उमा कारंडे सचीन कोळेकर, शारदा तमनर, शितल म्हसे, सिध्देश्‍वर भोईटे, सोमनाथ लांबे, तुषार तमनर, , तसेच विद्यार्थिनी प्रतिनिधी गौरी ढोकणे विद्यार्थी प्रतिनिधी चैतन्य कातोरे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांचे तसेच हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ज्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष हितचिंतकांनी मदत केली त्या सर्वांचे आभार डॉ.नरेंद्र इंगळे यांनी मानले.