विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ करुन हाकलून दिले.
फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून १० लाख रू. आणावेत म्हणून विवाहितेचा छळ.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
लग्नामध्ये पाहिजे ते दागीने दिले नाहीत, तसेच स्वयंपाक व्यवस्थीत येत नाही. आणि कोलकाता येथे फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून १० रूपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरूणीचा शारिरीक व मानसिक छळ करण्यात आला. या घटने बाबत सासरच्या चार जणांवर राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
सारीका विशाल कर्डक, वय ३२ वर्षे, रा. बंगला नं. १०५ लोढा हेवन, निलजे ग्रीन पार्क, गेट नं. ४ डोंबिवली पुर्व, तालुका कल्याण, जि. ठाणे. हल्ली रा. भुजाडी इस्टेट साईनगर, राहुरी. ता. राहुरी. या विवाहित तरूणीने राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, तीचे लग्न दि. २८ जानेवारी २०२० रोजी विशाल रमेश कर्डक याचे सोबत झाले होते.
लग्नानंतर काही दिवसानंतर सारिखा कर्डक ही सासू व पतीसह कोलकत्ता येथे पतीच्या नोकरीच्या ठिकाणी राहत होते. दरम्यान तूला स्वयंपाक व्यवस्थीत करता येत नाही. लग्नामध्ये आम्हाला मानपान दिला नाही. तसेच कोलकत्ता येथे फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून १० लाख रूपये आणावेत. या कारणावरुन सारिका कर्डक हिचा सासरच्या लोकांनी शारिरीक व मानसिक छळ सुरू केला.
वेळ प्रसंगी तीला शिवीगाळ करत उपाशी पोटी ठेवून लाथा बूक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच तीला घरातून हाकलून दिले. माहेरहून १० लाख रूपये घेऊन ये. नाहीतर तूला जिवंत सोडनार नाही, अशी धमकी दिली. या सर्व प्रकाराला कंटाळून सारिका कर्डक या विवाहित तरूणीने राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगीतला.
सारिका कर्डक हिच्या फिर्यादीवरून आरोपी १) पती- विशाल रमेश कर्डक सासरे, २) सासरा- रमेश मोहन कर्डक, ३) सासू- आशा रमेश कर्डक, सर्व रा. बंगला नं. १०५ लोढा हेवन, निलजे ग्रीन पार्क गेट, नं. ४ डोंबितली पुर्व, ता. कल्याण, जि ठाणे. ४) नणंद- सुजाता अपूर्व गवई, रा. शाॅप नं १०४ द पसेफिक प्लॅट नं. २२९ सेक्टर १३ खारघर, नवी मुंबई.
या चार जणांवर गुन्हा रजि. नं. ४८/२०२३ भादंवि कलम ४९८ (अ), ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक मेघशाम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
