सुंदर दिसणं आणि सुंदर असणं यात खूप मोठा फरक- पवार.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
कै. अ. ल. बिहाणी बाल विद्यामंदिर प्रशाला राहुरी. या शाळेमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब राठोड उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचा अतिशय सुंदर असा पोशाख केला होता. आम्रपाली चंद्रकांत संसारे या विद्यार्थिनीने राजमाता जिजाऊ यांचे विचार मांडले. सार्थक विशाल अमोलिक या विद्यार्थ्याने स्वामी विवेकानंद यांचे विचार मांडत असताना जीवन हे अल्पकाळ टिकणारे असून दुसऱ्यांसाठी जे जगतात, तेच खऱ्या अर्थाने जिवंत असतात. बाकीचे सारे जिवंत असूनही मेल्यासारखे आहे. हा स्वामी विवेकानंदांचा सुंदर विचार विद्यार्थ्यां समोर मांडला.
कोमल पवार या विद्यार्थिनीने स्वामी विवेकानंदाचा सुंदर असा वेशभूषा परिधान केला. व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसणं आणि सुंदर असणं यात खूप फरक आहे. हे विवेकानंदांचे विचार तिने व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यांनी केलेल्या भाषणाला सर्वांनी उत्तम असा प्रतिसाद दिला.
शिवाजी कवडे यांनी आभार मानले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक गुलाब मोरे यांनी विशेष सहकार्य केले. संस्थेचे सहसचिव अनुप बिहानी व सर्व पदाधिकारी यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.
