२७ वर्षीय तरूणीला अश्लील भाषेत शिवीगाळ करून विनयभंग करत जीवे मारण्याची धमकी.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
पूर्वी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्याचा राग मनामध्ये धरून सुरेश हनवत व चांगदेव नवले या दोन आरोपींनी एका २७ वर्षीय तरुणीला अश्लील भाषेत शिवीगाळ करत तीला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. तसेच तूला व तूझ्या मुलींना जीवे मारण्याची सुपारी दिली आहे. अशी धमकी दिल्याची घटना राहुरी तालूक्यातील गुंजाळे येथे दिनांक ९ जानेवारी रोजी घडलीय.
या घटनेतील २७ वर्षीय तरूणीने यापूर्वी आरोपी सुरेश हनवत याच्यावर गुन्हा दाखल केला होता. या घटनेचा राग मनामध्ये धरून आरोपी हे दिनांक ९ जानेवारी रोजी रात्री साडेदहा वाजे दरम्यान सदर तरूणीच्या घरासमोर गेले. तीला अश्लील भाषेत शिवीगाळ करुन तीला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. तसेच तुला व तुझ्या मुलींना जीवे मारण्यासाठी मी सुपारी दिलेली आहे, अशी धमकी दिली.
घटनेनंतर सदर तरूणीने राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगीतला. तीच्या फिर्यादीवरून आरोपी १) सुरेश वजीर हनवत, २) चांगदेव नवले, दोघे राहणार गुंजाळे, ता. राहुरी.
या दोघांवर गुन्हा रजि. नं. ३१/२०२३ भादंवि कलम ३५४, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे विनयभंग व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक घनश्याम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार साईनाथ टेमकर हे करीत आहेत.
