४० वकिलांच्या उपस्थितीत एनसीडीसी ची बैठक संपन्न.
ख्रिस्ती धर्म स्वीकारला तरी त्यांची जात बदलत नाही- ॲड. प्रताप पंडित.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी येथील स्नेहसदन चर्च येथे एन सी डी सी ची बैठक आनंदात पार पडली. मिटिंगसाठी जिल्ह्यातील ४० वकिलासह तालुक्यातील धर्मगुरू, पास्टर व ५० सभासद हजर होते. सदरची बैठक दलित ख्रिस्ती समाजासाठी राजस्तरीय बैठक शासन स्तरावर अडचणी व मार्गदर्शन करणेसाठी आयोजित करण्यात आली होती.
सदर बैठकीसाठी एन सी डी सी चे राष्ट्रीय कमीटी सदस्य अँड. प्रताप पंडित व डॉ. एकनाथ पाटोळे उपस्थित होते. अँड. प्रताप पंडित यांनी सुप्रीम कोर्टात दलित ख्रिस्तीना अनुसूचित जातीच्या सवलती मिळणे बाबत केलेले वेगवेगळे दाव्या संदर्भात इतमभूत माहिती दिली.
वेगवेगळ्या राज्यामध्ये दलित ख्रिश्चनांना कशा प्रकारे सवलती दिल्या जातात, दलित समाज्यातील लोकांनी जरी ख्रिस्ती धर्म स्वीकारला तरी त्यांची जात बदलत नाही. तसेच त्याचे सामाजिक आर्थिक व सर्व परिस्थितीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे त्यांना अनुसूचित जातीच्या सवलती मिळणे क्रमप्राप्त आहे. असे प्रतिपादन ॲड. प्रताप पंडित यांनी केले.
डॉ. एकनाथ पाटोळे यांनी ख्रिस्ती समाज हा शांतता प्रिय असून डॉ. बाबासाहेब यांनी लिहिलेल्या राज्य घटनेचे सर्व तत्वाचे पालन करतो व राज्यघटनेचा आदर करतो. त्यांनी दिलेल्या मार्गदर्शक तत्वाचा अवलंब करून मार्गक्रमन करीत असतो. त्यामुळे इतर समाज ही ख्रिस्ती सामाज्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन निर्मळ आहे. ख्रिस्ती धर्मगुरू हे अतिशय सेवाभावी असून नेहमी समाजाच्या हिताचा विचार करून धार्मिक, समाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उत्तम प्रकारे काम करीत असतात.
परंतु ख्रिस्ती समाजातही काही अप प्रवृत्ती शिरल्याने संपूर्ण सामाज्यावर त्याचा शिक्का बसतो. त्यामुळे ख्रिस्ती समाज्याने अशा अप प्रवृत्तीचा कोणत्याही प्रकारे थारा देऊ नये, असे स्पष्ट प्रतीपादन केले.
या प्रसंगी माजी जिल्हा सरकारी वकिल विनायक पंडित यांनी ख्रिस्ती मिशनरी यांनी शैक्षणिक, समाजिक व वैद्यकीय क्षेत्रातील गेले २०० वर्षातील आढावा सदर केला. वकील पी. एस. सींग यांनी धर्मगुरू यांनी कशा प्रकारे वर्तन करावे, याबाबत सूचना केल्या. पास्टर बिपीन गायकवाड यांनी पाळक लोकांनी आपले धार्मिक कार्य कसे करावे, या बाबत मार्गदर्शन केले.
या बैठकीसाठी स्नेहसदन चर्च चे प्रमुख धर्मगुरू फादर मायकल राजा तसेच फादर मॅथ्यु, केंदळ धर्मग्रामचे फादर ऑलवीन, नारायण येवले, एन. वाय. शिरसाठ, एस. पी. घोरपडे, रमाकांत राठोड, राजेंद्रा भोसले, प्रमोद सगळगीळे, चंद्रकांत कदम, प्रमोद आवारी, संजय दुशिंग, वर्षा शेळके, नरेंद्र भिंगारदिवे, श्याम कौर, एस. एस. ठुबे
या वकिलासह लॉरेन्स गायकवाड, ॲड. प्रकाश संसारे, एन सी डी सी महाराष्ट्र उपाध्यक्ष तसेच जयंती पाटोळे ह्या हजर होत्या. कार्यक्रमासाठी अशोक पलघडमल, नवीन साळवे, सयाजी गुरुजी, अमृत साळवे, रोशन श्री, सखाहारी बोर्डे यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमांचे सूत्र संचालन प्रगत पदवीधर संघटनेचे उपाध्यक्ष रत्नाकर दोंदे यांनी केले. यावेळी फादर मायकल राजा यांचे विषेश आभार मानले गेले. बैठकीसाठी एनसीडीसी चे उपाध्यक्ष अँड. प्रकाश संसारे यांनी आयोजन केले व बैठक खेळीमेळीच्या वातावरणात व उत्साहात पार पडली. या बैठकीसाठी जिल्ह्यातील अनेक वकील हजर होते.
