Type Here to Get Search Results !

राहुरी - मराठी पत्रकार परिषदेच्या तालूकाध्यक्ष पदी धसाळ, उपाध्यक्ष पदी जाधव यांची निवड.

 मराठी पत्रकार परिषदेच्या तालूकाध्यक्ष पदी धसाळ, उपाध्यक्ष पदी जाधव यांची निवड.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


राहुरी तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्ष पदी विनित आनंदराव धसाळ यांची, कार्याध्यक्ष पदी रफिकभाई शेख, उपाध्यक्ष पदी संतोष जाधव, समन्वयक राहुल गाडेकर आदींची निवड करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य यांनी दिली आहे.


मराठी पत्रकार परिषदेची राहुरी तालुका पदाधिकारी निवडीसाठी जिल्हा कार्यकारीणी खजिनदार रियाज देशमुख, सल्लागार राजेंद्र उंडे, सदस्य आकाश येवले यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. यावेळी सदर निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत.


 यामध्ये जेष्ठ मार्गदर्शक- निसारभाई सय्यद, विलास कुलकर्णी, संजय कुलकर्णी, हेमंत मिसाळ, सुनील रासने, अध्यक्ष- विनित धसाळ, कार्याध्यक्ष- रफिक शेख, उपाध्यक्ष- संतोष जाधव, समन्वयक- राहुल गाडेकर, सरचिटणीस- प्रभाकर मकासरे, खजिनदार- राजेंद्र आढाव, संघटक- श्रीकांत जाधव, संपर्क प्रमुख- बाळासाहेब कांबळे, प्रसिद्धी प्रमुख- दत्तात्रय तरवडे, कार्यकारिणी सदस्य- विजय येवले, गोविंद फुणगे, भिमराज गुंड, महेश कासार, ऋषी राऊत, समीर शेख, शकुर तांबोळी, भगवान लांडे, अनिल वाकचौरे, समर्थ वाकचौरे, शरद ढमक आदींची निवड करण्यात आली आहे.


नूतन पदाधिकारी व कार्यकारीणीचे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, प्रदेशाध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष गोपी लांडगे, प्रदेश प्रतिनिधी सुनिल नवले, नाशिक विभागीय सचिव रोहिदास हाके, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य, दक्षिण जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके, डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष आफताब शेख यांच्यासह सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.