तालुकाध्यक्ष पदी मुकूंद बुऱ्हाडे, उपाध्यक्षपदी प्रसाद मैड यांची नियुक्ती.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
गोल्ड असोसिएशन महाराष्ट्र ( रजिस्टर ) या राज्यस्तरीय सुवर्ण पारखींच्या संघटनेच्या राहुरी तालुका अध्यक्षपदी येथील सराफ मुकुंद दिगंबर बुऱ्हाडे यांची तर उपाध्यक्षपदी सराफ प्रसाद भगवान मैड यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.
असोसिएशनच्या महाराष्ट्र अध्यक्ष पुरुषोत्तम काळे, कार्याध्यक्ष राजेंद्र दिंडोरकर, मुख्य संघटक भैय्या भामरे, प्रशासकीय सचिव सतीश पितळे यांनी नुकतेच सदर नियुक्तीपत्र मुकूंद बुऱ्हाडे व प्रसाद मैड यांना दिले. सराफ मुकुंद बुऱ्हाडे हे राहुरी सराफ संघटना व कारागीर संघटनेचे सदस्य असून साई आदर्श मल्टीस्टेट संस्थाचे ते अधिकृत गोल्ड व्हॅल्यूवर आहेत. तर प्रसाद मैड हे एडीसीसी बँक राहुरी व स्टेट बँक ऑफ इंडिया राहुरी शाखेचे अधिकृत गोल्ड व्हॅल्यूवर आहेत.
त्यांच्या नियुक्तीचे असोसिएशनचे उपाध्यक्ष नचिकेत भुरके, राजाभाऊ वाईकर, खजिनदार दीपक देवरुखकर, उपखजिनदार कालिदास कांदळगावकर तसेच राहुरीतील सदस्य संतोष मैड, सागर मुंडलिक, मुकुंद वेदपाठक, विश्वास बुऱ्हाडे, किरण नांदुरकर आदींनी अभिनंदन केले आहे.
राहुरी सह उत्तर नगर जिल्ह्यात गोल्ड व्हॅल्यूवर सभासद वाढवणे व येत्या २८ जानेवारीला मुंबई येथील सोने परीक्षण करणाऱ्या गोल्ड व्हॅल्युएरचे असोसिएशनच्या वतीने होणाऱ्या कार्यशाळेसाठी अधिकाधिक प्रतिनिधी सहभागी करण्याचा मानस बुऱ्हाडे व मैड यांनी व्यक्त केला आहे.

