Type Here to Get Search Results !

राहुरी - सोमवंशीय क्षत्रिय कासार समाजाचे कुलदैवत श्री कालिका देवीचा यात्रा उत्सव.

 सोमवंशीय क्षत्रिय कासार समाजाचे कुलदैवत श्री कालिका देवीचा यात्रा उत्सव.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


सोमवंशीय क्षत्रिय कासार समाजाचे कुलदैवत असलेल्या श्रीक्षेत्र निनगुर (नेकनुर ता. जि. बीड) येथील श्री कालिका देवीचा यात्रा उत्सव चैत्र शु || द्वादशी सोमवार दिनांक ३ एप्रिल ते चैत्र शू|| पौर्णिमा गुरुवार दिनांक ६ एप्रिल २०२३ या कालावधीत विविध धार्मिक सामाजिक उपक्रमानी संपन्न होणार आहे. अशी माहिती देवस्थानाचे अध्यक्ष  शिवाजी काटकर, सचिव डाॅ. सोनाजी पाटील यांनी दिली.


यात्रा उत्सव काळात सकाळी ६ वा. सप्तशती पाठ, ७ वा. श्रीकालिकामातेस विधिवत अभिषेक आरती,  सायंकाळी ७ वा. आरती, नैवेद्य व आराधना, (महाप्रसाद) मुख्य दिवस चैत्र शु पोर्णिमा गुरुवार दि. ६ एप्रिल रोजी दुपारी २ वा. देवस्थानच्या वतीने समाज बांधवाची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे.


 सभेचे अध्यक्षस्थानी अखिल भारतीय सोक्ष कासार समाजाचे अध्यक्ष शरद भांडेकर भुषविणार आहेत. या प्रसंगी समाजातील विविध मान्यवरांच्या सत्कार तसेच रात्री १० वा. श्री चा छबिना निघून शोभेच्या दारू कामाने उत्सवाची सांगता होणार आहे.


बुधवार दिनांक ५ एप्रिल रोजी दुपारी २ वा. लिंबा गणेश येथील महिला मंडळाच्या वतीने संगीत भजनाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री १० वा. विविध गुणदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.


समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री कालिका मातेच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा. असे आवाहन महेश कासार, देवीदास दहिवाले, गणेश कासार, बंडू निनगुरकर, अशोक निनगुरकर, वैभव खुटाळे, किशोर निनगुरकर, राम पाथरकर, संजय कासार यांच्या वतीने 

करण्यात आले आहे.