Type Here to Get Search Results !

राहुरी - राहुरी ते टाकळीमिया रस्त्याचे काम मार्गी लावा अन्यथा उग्र आंदोलन- सुनिल‌ निमसे.

 राहुरी ते टाकळीमिया रस्त्याचे काम मार्गी लावा अन्यथा उग्र आंदोलन- सुनिल‌ निमसे.




राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या राहुरी ते टाकळीमिया रस्त्याची अत्यंत दयनिय अवस्था झाली असुन या रस्त्याने ये जा करणाऱ्यांनी पंचायत समितीच्या बांधकाम विभाग व या गट व गणात सदस्य म्हणून मिरवणाऱ्यांन बाबत संताप व्यक्त केला जात आहे.


 या रस्त्याचे लवकरात लवकर काम हाती घ्यावे, अन्यथा उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष सुनिल निमसे यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात दिला आहे. 


दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राहुरी ते टाकळीमियाँ या रस्त्यावर कायम मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या रस्त्याने शालेय विदयार्थी, शेतकरी, दुध उत्पादक, नोकरदार वर्ग, तसेच आजुबाजुचे अनेक ग्रामस्थांची रेलचेल असते. या बरोबरच या भागात मंगल कार्यालय व शाळा हायस्कुल असलेने स्कूल बससह सायकल‌ व दुचाकीवर विद्यार्थी ये जा करत असता.


सदर रस्त्याची दुरवस्था ही अनेक वर्षा पासुनची आहे. संबधीत रस्त्यावर अनेक अपघात होउन अनेकांना गंभीर दुखापत झालेली आहे. विद्यार्थी व दुध उत्पादक शेतकरी अपघातात जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक जणांचा मृत्यु झालेले आहेत. या सर्व घटना घडत असताना जिल्हा परिषद रस्ते बांधकाम विभाग याकडे व राजकीय नेते याकडे दुर्लक्ष करित आहे.


या रस्त्याचे काम त्वरित मार्गी किंवा तात्पुरते स्वरूपात दुरुस्त न झाल्यास व भविष्यात अपघातात कोणतीही व्यक्ती गंभीर जखमी अथवा मृत्यु पावल्यास याची संपुर्ण जबाबदारी राहुरी पंचायत समिती, जिल्हा परिषद अहमदनगर व महाराष्ट्र राज्य सरकार यांची राहील.


 त्याच प्रमाणे अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस संभाजीराजे दहातोंडे समवेत जिल्हा परिषद आवारात समस्त गावकरी व जिल्हा कार्यकर्ते व समवेत अंदोलन करण्यात येईल. याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची राहील. असे निवेदनात म्हटले आहे.


निवेदनाच्या प्रति केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर तसेच राहुरी पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. 


यावेळी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुनिल निमसे, विराज सोनवने, संजय गायकवाड, अनिल सोनवणे, बालाजी शिंदे, रमेश चौधरी, शुभम मेहेत्रे, आप्पासाहेब नरवडे, मल्हारी ढोकणे, संदिप शिंदे, संभाजी सिरसाट, गागरे आदि उपस्थित होते.