Type Here to Get Search Results !

राहुरी - 21 नवीन रोहित्रे बसविण्यास सुमारे 1 कोटी 39 लाख रुपये खर्चास मंजुरी- आ. प्राजक्त तनपुरे.

 21 नवीन रोहित्रे बसविण्यास सुमारे 1 कोटी 39 लाख रुपये खर्चास मंजुरी- आ. प्राजक्त तनपुरे.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


राहुरी विधानसभा मतदार संघासाठी सुमारे 21 नवीन रोहित्रे बसविण्यास सुमारे 1 कोटी 38 लाख 90 हजार रुपये खर्चास मंजुरी मिळाली असल्याची माहिती माजी मंत्री व आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिली.


आमदार तनपुरे यांनी विशेष प्रयत्न केल्याने नव्याने रोहित्रे मिळाली आहेत. यामध्ये करंजी (क्षेत्रे वस्ती) ता. पाथर्डी 17  लाख 80 हजार, शंकरवाडी (भवार वस्ती) ता. पाथर्डी 8  लाख 90  हजार, राघोहिवरे (मराठे वस्ती) 8 लाख 15 हजार, गीतेवाडी (वाघदरा) 8 लाख 20 हजार, करंजी ता. पाथर्डी (इनाम वस्ती) 5 लाख, मिरी (तोडमल वस्ती) ता. पाथर्डी 5 लाख, शिराळ (घोरपडे वस्ती) ता. पाथर्डी  5 लाख, 


आडगाव  (सोन्नर) ता. पाथर्डी 5 लाख, पांगरमल (आव्हाड वस्ती) ता. नगर 4 लाख 58 हजार, नागरदेवळे (हजारे वस्ती) ता. नगर 6 लाख, ताहराबाद (हराळे वस्ती) ता. राहुरी 5 लाख 75 हजार, म्हैसगाव (हुलुळे वस्ती) 4 लाख 90 हजार, कोळेवाडी (गावठाण) 5 लाख 36 हजार, व (जाधव वस्ती) 4 लाख 90 हजार, जांभळी (पवार-बर्डे वस्ती) 5 लाख 65 हजार, गुहा (ओहोळ वस्ती) 6 लाख 82 हजार,


 कानडगाव (संसारे वस्ती) 8 लाख, सात्रळ (पडघलमल वस्ती) 7 लाख, सूर्यभान देवरे (शिलेगाव) 3 लाख 78 हजार,  सात्रळ (पडघमल वस्ती पाणीपुरवठा) 7 लाख 46 हजार, ताहराबाद (विधाटे वस्ती) 7 लाख 65 हजार असा निधी वितरित होऊन नवीन रोहित्रे बसणार आहे. यामुळे संबंधित गावातील लाभधारकांनी आमदार प्राजक्त तनपुरे यांचे आभार मानले.