Type Here to Get Search Results !

घोडेगाव - शिंगवे ते गोरडेमळा या महत्वाच्या रस्त्यासाठी जिल्हा वार्षिक आराखड्यातुन ५० लाख रुपयांचा निधी मंजूर

 आंबेगाव तालुक्यातील शिंगवे ते गोरडेमळा या महत्वाच्या रस्त्यासाठी जिल्हा वार्षिक आराखड्यातुन ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. सदर कामाचा भूमिपूजन समारंभ शिवसेनेचे उपनेते मा. खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील व शिवसेनेचे पदाधिकारी व शिंगवे ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाला.




या अतिशय महत्त्वपूर्ण रस्त्यासाठी गेली वर्षभरापासून शिंगवे गावातील शिवसैनिकांनी  शिवाजी दादा आढळराव पाटील यांच्याकडे आग्रही मागणी केली होती. सदर रस्त्याचे काम प्राधान्याने पूर्ण केले जाईल असा शब्द त्यांनी ग्रामस्थांना दिला होता. त्याची परिपूर्ती करत या मंजूर कामाचा भूमिपूजन समारंभ मोठ्या उत्साहाने संपन्न झाला, याबद्दल ग्रामस्थांनी अतिशय समाधानाची व आनंदाची भावना दादांकडे व्यक्त केली.