वन रॅंक वन पेन्शन आंदोलनासाठी माजी सैनिक संघटना शिरूर तालुकाचा जाहीर पाठिंबा
वन रॅंक वन पेन्शन आंदोलनासाठी देशभर आज माजी सैनिकांच्या कडुन निवेदन सत्र
प्रतिनिधी सुनिल पिंगळे शिक्रापुर
आज दिनांक 30/5/2023 रोजी माननीय तहसीलदार सो. शिरूर यांना शिरूर तालुका माजी सैनिक प्रतिनिधी यांचे द्वारे OROP चे विसंगती बाबत आणि JCOs आणि जवानांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी गेल्या 100 दिवसांपासून जंतर मंतर वर चालू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांना योग्य तो न्याय देण्यासाठी निवेदन देण्यात आले.
शिरूर तहसीलदार यांना निवेदन देऊन साखळी आंदोलनास पाठिंबा दिला वन रॅंक वन पेन्शन योजनेअंतर्गत जेसीओ जवानांवर झालेल्या अन्यायाविरोधात नवी दिल्ली येथे जंतरमंतर मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेऊन त्यावर योग्य कार्यवाही होण्यासाठी भारतीय माजी सैनिक संस्था शिरूर तालुका यांच्या वतीने तहसीलदार शिरुर यांना प्रतिकात्मक निवेदन देण्यात आले
गेले 20 फेब्रवारी 2023 पासुन भारतातील तमाम माजी सैनिक हे दिल्ली येथील जंतरमंतर मैदानावर वन रॅंक वन पेन्शन मध्ये असणाऱ्या विसंगती दुर करण्यासाठी व समान पेन्शन इत्यादि मागण्या घेऊन जंतरमंतर दिल्ली या ठिकाणी लोकशाही पध्दतीने आंदोलन चालु आहे सध्या स्थितीला सरकार आणि मागील सरकार व संबंधित अधिकारी वर्ग यांच्याकडून पेन्शन व तमाम भत्ते याबाबत जवानांवर अन्याय झाला आहे याला वाचा फोडण्यासाठी नवी दिल्ली येथील जंतरमंतर मैदानावर माजी सैनिक संघटनेचे आंदोलन चालू आहे याला जाहीर पाठिंबा दर्शविण्यासाठी भारतीय माजी सैनिक संस्था शिरूर तालुका यांच्या वतीने शिरूर तहसीलदार यांना प्रतिकात्मक निवेदन आज देण्यात आले सादर अनेक दिवसांपासून पुकारलेल्या आंदोलनाला भारतीय माजी सैनिक संस्था शिरूर तालुका व तालुक्यातील तमाम सैनिक वीरमाता,वीरपिता,वीरपत्नी यांचा जाहीर पाठिंबा दिला असुन माननीय तहसीलदार शिरूर यांच्या माध्यमातून हे निवेदन शासनापर्यंत पोहोचवावी असे ह्या निवेदन म्हटलं आहे तर यावेळी भारतीय माजी सैनिक संघटनेचे खालील प्रतिनिधी उपस्थित होते.
श्री. संभाजीराव धुमाळ, श्री. सुरेश उमाप, श्री. रावसाहेब आदक,श्री बाळासाहेब शेवाळे,
श्री. नंदकिशोर रोडे, श्री. बाळासाहेब मुरकुटे,श्री. आनंदराव ढमढेरे, श्री. बाळासाहेब मुरकुटे, श्री. दतात्रय वाखारे,श्री. एकनाथ महाजन
तसेच शिरूर तालुक्यातील मोठ्या संख्येने माजी सैनिक, वीरपत्नी हजर होते तर या आंदोलनाच्या माध्यमातून का होईना हा आवाज सरकारांच्या कानापर्यंत पोहाचला जाईल असा हेतु यामागील आंदोलनाचा आहे अत्यंत शांतीपूर्ण व संवैधानिक पध्दतीनं लोकशाही मार्गाने साखळी आंदोलन जंतरमंतर मैदानावर सुरू आहे याला पाठिंबा म्हणुन निवेदन मा तहसीलदार शिरुर यांना देण्यात आले

